पेट्रोल डिझेल वरील एक्साईज ड्युटी मध्ये 3 रुपयांनी वाढ; मोदी सरकारच्या निर्णयाने सर्वसामान्यांना झळ
पेट्रोल-डिझेलवरील उत्पाद शुल्क (Excise Duty) 3 रुपयांनी वाढवण्यात आले आहे. याची झळ नक्कीच सामान्य जनतेला बसणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने घसरण होत असताना आता मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क (Excise Duty) 3 रुपयांनी वाढवण्यात आले आहे. याची झळ नक्कीच सामान्य जनतेला बसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किंमतीत सातत्याने घसरण होत होती. त्यामुळे येत्या काही दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किंमती अधिकच कमी होण्याची शक्यता होती.
न्युज एजेन्सी पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किंमतीत घसरण झाल्याने कंपन्यांना होणारा तोटा भरुन काढण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. पेट्रोलच्या एक्साईज ड्युटीत 2 ते 8 रुपयांनी वाढ कऱण्यात आली असून डिझेलवरील एक्साईज ड्युटी 4 रुपयांनी वाढवण्यात आली आहे.
ANI Tweet:
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सातत्याने कपात होत होती. शुक्रवारी पेट्रोलचे दर दिल्ली, मुंबईत 14 पैशांनी तर कोलकत्ता येथे 13 पैशांनी कमी झाले होते. चेन्नई येथे दरात 15 पैशांनी कपात झाली होती. इंडियन ऑईल वेबसाईटनुसार, शुक्रवारी दिल्ली, कोलकत्ता, मुंबई आणि चेन्नई् येथे पेट्रोलच्या किंमती अनुक्रमे 70 रुपये, 72.70 रुपये, 75.70 आणि 72.71 रुपये प्रति लीटर होत्या. तर डिझेलच्या किंमती अनुक्रमे 62.74 रुपये, 65.07 रुपये, 65.68 रुपये आणि 66.16 रुपये प्रति लीटर होत्या.