TN Seshan Passed Away: माजी निवडणूक मुख्य आयुक्त टी.एन. शेषन यांचे वयाच्या 87व्या वर्षी निधन

एन. शेषन (T.N. Seshan) यांचे आज वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले आहे. चेन्नई (Chennai) मध्ये आज त्यांचे निधन झाल्याचे समजत आहे.

TN Seshan (Photo Credits: Twitter)

भारतातील निवडणूकांचा डोलारा सुरळीत चालवणाऱ्या निवडणूक आयोगाचे (Election Commission)  दहावे मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) टी. एन शेषन (T.N. Seshan)  यांचे आज कार्डियाक अरेस्टमुळे (Cardiac Arrest) वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले आहे. चेन्नई (Chennai) मध्ये आज त्यांचे निधन झाल्याचे समजत आहे. भारतीय निवडणुकांच्या बाबतीत अनेक आमूलाग्र बदल घडवून आणणारे आयुक्त म्ह्णून शेषन यांची ओळख आहे. 1996 मध्ये त्यांना मॅगसेसे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवृत्त झाल्यानंतर 1997 मध्ये त्यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढली होती. पण माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी त्यांचा पराभव केला होता.

12 डिसेंबर 1990 ते 11 डिसेम्बर 1996  पर्यंतच्या कालावधीत शेषन यांनी केलेल्या कामांमध्ये आचारसंहितेचा नियम हा भारताच्या राजकीय इतिहासातील सर्वात महत्वाचा निर्णय म्ह्णून प्रसिद्ध आहे. याशिवाय, निवडणूक प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी तीन-चार टप्प्यात मतदान घेणे, मतदारांसाठी ओळखपत्र तयार करणे या कल्पनाही त्यांनीच मांडल्या होत्या.

पहा ट्विट

प्राप्त माहितीनुसार, यामागील काही काळात शेषन यांना स्मृतिभ्रंशाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांने त्यांना घरापासून 50 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या वृद्धाश्रमात ठेवले होते. तीन वर्ष वृद्धाश्रमात घालविल्यानंतर जेव्हा ते पुन्हा घरी परतले तेव्हा करमत नसल्याने आपले शेवटचे दिवशी त्यांनी वृद्धश्रमातच घालवण्याचा निर्णय घेतला होता.