Ahmedabad: लग्नाला 22 महिने होऊनही पत्नी शारीरिक संबंध ठेऊ देत नव्हती; नैराश्यग्रस्त पतीने केली आत्महत्या, बायकोविरुद्ध गुन्हा दाखल
तिच्यावर पतीला आत्महत्या करण्यास प्रवूत्त केल्याचा आरोप आहे. लग्नाला तब्बल 22 महिने उलटूनही तिने पतीला शारीरिक संबंध (Sex) ठेऊ न दिल्याचा तिच्यावर आरोप केला गेला आहे.
अहमदाबादच्या (Ahmedabad) शहरकोटडा पोलिसांनी मनीनगर येथील 32 वर्षीय गीता परमार नावाच्या महिलेविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तिच्यावर पतीला आत्महत्या करण्यास प्रवूत्त केल्याचा आरोप आहे. लग्नाला तब्बल 22 महिने उलटूनही तिने पतीला शारीरिक संबंध (Sex) ठेऊ न दिल्याचा तिच्यावर आरोप केला गेला आहे. पत्नी शारीरिक संबंध ठेऊ देत नाही हे लक्षात येत नवऱ्याला नैराश्या आले व त्याने आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीला आरोपी मानून तिच्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गीता परमार जयंती वकील चाळ येथील रहिवासी आहेत.
6 ऑगस्ट रोजी मृतक सुरेंद्र सिंगची 55 वर्षीय आई मूली परमार यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली व आपल्या सुनेवर हे सर्व आरोप केले. त्यांनी आपल्या मुलाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप सुनेवर लावला आहे. एफआयआरमध्ये सुरेंद्र सिंह यांची आई मूली परमार यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा सुरेंद्र हा रेल्वेचा कर्मचारी होता. ऑक्टोबर 2018 मध्ये त्याचे गीताशी लग्न झाले होते. यापूर्वी 2016 मध्ये पहिल्या पत्नीबरोबर त्याचा घटस्फोट झाला होता. याशिवाय गीतानेही यापूर्वीही दोन पुरुषांना घटस्फोट दिला होता.
तिने सांगितले की, ‘एकदा मी मुलाच्या खोलीत गेलो तेव्हा मला मुलगा आणि सून दोघेही स्वतंत्र बेडवर झोपलेले आढळले. जेव्हा आपण आपल्या मुलाला याविषयी विचारले तेव्हा तो म्हणाला की, त्याचे आपल्या पत्नीशी शारीरिक संबंध नाहीत. गीताने शपथ घेतली आहे की, ती तिच्या पतीशी शारीरिक संबंध ठेवणार नाही. यामुळे तो मानसिक तणावात राहायचा. या प्रकरणात दोन्ही वेळी बर्यापैकी भांडणही झाले. एकदा तर हे भांडण इतके वाढले की, गीता तिच्या पालकांकडे निघून गेली. यानंतर सुरेंद्रसिंहनेही तिचा फोन नंबर ब्लॉक केला.’ (हेही वाचा: पॉर्न फिल्म शुटींग प्रकरणातील मास्टरमाइंड बृजेंद्र सिंह याला इंदौर येथे अटक, मॉडेलिंगच्या नावाखाली करायचा अश्लिल चित्रिकरण)
27 जुलै रोजी घरातील सदस्य एका अंत्ययात्रेसाठी गेले होते, त्यावेळी सुरेंद्र घरात एकटाच होता. यावेळी त्याने आत्महत्या करून आपले जीवन संपवले.