Manipur Disturbed Area: संपूर्ण मणिपूर 'अशांत क्षेत्र' म्हणून घोषीत, केवळ 19 पोलिस स्टेशन्स वगळून
राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेनुसार यातून केवळ 19 पोलीस स्टेशनचा परिसर वगळण्यात आला आहे. उर्वरीत राज्याला सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) म्हणून घोषीत करण्यात आले आहे.
Manipur News Today: कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या नावाखाली मणिपूर सरकारने संपूर्ण राज्यच 'अशांत क्षेत्र' म्हणून घोषीत केले आहे. राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेनुसार यातून केवळ 19 पोलीस स्टेशनचा परिसर वगळण्यात आला आहे. उर्वरीत राज्याला सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) म्हणून घोषीत करण्यात आले आहे. सरकारच्या अधिसूचनेत म्हटले आहे की, संपूर्ण मणिपूर राज्यात विविध अतिरेखी/बंडखोर गटाकडून कारवाया सुरु आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सशस्त्र दलाची मदत घ्यावी, असे राज्य सरकारचे मत आहे. त्यामुळे सदर परिसर अशांत क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, 1 ऑक्टोबर 2023 पासून हे आदेश लागू असतील.
मणिपूर अशांत क्षेत्र परिसरातून वगळण्यात आलेली पोलीस स्टेशन्स: इम्फाळ, लॅम्फेल, सिटी, सिंगजामेई, सेकमाई, लामसांग, पटसोई, वांगोई, पोरोम्पॅट, हेनगांग, लमलाई, इरिलबुंग, लीमाखोंग, थौबल, बिष्णुपूर, नंबोल, मोइरांग, काकचिंग आणि जिरीबाम.
राज्य सरकारने इंटरनेट सेवा काही अवधीसाठी सुरु केली. दरम्यान, राजधानी इंफाळमध्ये दन विद्यार्थ्यांचे अपहरण घडले. पुढे त्यांची हत्या करण्यात आली. त्यातून विद्यार्थ्यांच्या गटाने मोठ्या प्रमाणावर निषेध मोर्चा काढला. त्याचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यतून पुन्हा नव्याने हिंसाचार सुरु झाला. त्यात आंदोलक आणि रॅपीड अॅक्शन फोर्स (RPF) यांच्यात चकमकही झाली. ज्यामध्ये जवळपास 45 आंदोलक जखमी झाल्याची माहिती आहे. अधिक माहिती अशी की, फिजम हेमजीत (वय-20) आणि हिजाम लिंथोइंगम्बी (वय-17) हे दोन विद्यार्थी जुलै महिन्यापासून बेपत्ता होते. त्यांचे काही फोटो कथीतपणे पुढे आले आहेत. त्यापैकी एका फोटोत हे दोघे सशस्त्र व्यक्तीसोबत दिसत आहेत. तर, दुसऱ्या फोटोमध्ये ते मृत असल्याचे दिसत आहेत. विद्यार्थ्यांबाबत आलेली माहिती कथीत स्वरुपाची असून लेटेस्टली मराठी त्याची पुष्टी करत नाही.
ट्विट
दरम्यान, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी म्हटले आहे की, केंद्र आणि राज्य सरकार गुन्हेगारांना पकडण्याचे काम एकत्रितपणे करत आहेत. दोन्ही तरुणांच्या हत्येचे प्रकरण सीबीआकडे सोपवले आहे. त्यांच्या तपासातून नेमके काय घडले याबाबत माहिती पुढे येईल. दरम्यान मणीपूर पोलीस आणि सीआरपीएफ तसेच आरएएफ जवानांच्या तुकड्याही इम्फाळ आणि राज्याच्या इतर भागात तैनात करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी हिंसाचार झाला आहे., असेही मुख्यमंत्री म्हणाले.