आज निवडणुक आयोग पत्रकार परिषद घेणार, आचार संहिता लागू होण्याची शक्यता

आज रविवारी (10 मार्च) निवडणुक आयोगाने (Election Commission) पत्रकार परिषदेचे आयोजन संध्याकाळी 5 वाजता केले आहे.

Election Commission of India | File Image | (Photo Credits: PTI)

आज रविवारी (10 मार्च) निवडणुक आयोगाने (Election Commission) पत्रकार परिषदेचे आयोजन संध्याकाळी 5 वाजता केले आहे. तर या पत्रकार परिषदेत आगामी निवडणुकांच्या तारखा स्पष्ट केल्या जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निवडणुक आयोगाची आज पत्रकार परिषद झाल्यानंतर संध्याकाळपासून आचार संहिता लागू होण्यची शुक्यता आहे. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी पासूनच राजकीय पक्षांनी आगामी निवडणुकीसाठी तयारी करण्यास सुरुवात केली आहे. तर भाजप पक्षाकडून जाहिरातबाजी करण्यात येत असल्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे निवडणुक आयोग तारखा सांगण्यास वेळ लावत असल्याचे ही काहींनी म्हटले आहे.(हेही वाचा-प्रचाराच्या वेळी जवानांचे फोटो वापरु नये, निवडणुक आयोगाचे आदेश)

देशात 7 ते 8 टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रात मुंबई, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ अशा तीन टप्प्यात मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.