Lok Sabha Election Dates: लोकसभा निवडणूक कार्यक्रम आज होणार जाहीर; जाणून घ्या ECI कधी घेणार पत्रकार परिषद

बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकीच्या तारखा (Lok Sabha Election Dates) आज (14 मार्च 2024) दुपारी 3 वाजता जाहीर केल्या जातील, असे भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) जाहीर केले आहे.

Voting | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकीच्या तारखा (Lok Sabha Election Dates) आज (14 मार्च 2024) दुपारी 3 वाजता जाहीर केल्या जातील, असे भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकासह, ECI चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांचेही अनावरण करेल. या राज्यात लोकसभा आणि विधानसभा एकाच वेळी होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या तारखांसह निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आदर्श आचारसंहिता (ECI Model Code of Conduct) लागू होणार आहे. या कार्यक्रमामुळे भारताच्या लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण टप्प्याची सुरुवात होईल.

सोशल मीडिावरुन निवेदन

भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) घोषित केले आहे की ते आज दुपारी 3 वाजता 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करतील. आयोगाकडून सोशल मीडिया मंच 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर याबाबत एक निवेदन जाहीर करण्यात आले आहे. मागील लोकसभा निवडणूक 2019 मध्ये 11 एप्रिल ते 19 मे या कालावधीत मतदान सात टप्प्यांमध्ये पार पडले आणि चार दिवसांनी निकाल जाहीर झाला. आगामी 2024 च्या निवडणुकांसाठी, चार राज्ये - अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम - एप्रिल/मे मध्ये मतदान करणे अपेक्षित आहे. याशिवाय महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. उल्लेखनीय म्हणजे, लडाखसह जम्मू आणि काश्मीर, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 30 सप्टेंबरपर्यंत राज्याचा दर्जा पुनर्संचयित करण्याच्या उद्देशाने निवडणुका घेण्यास तयार आहेत. (हेही वाचा, Code Of Conduct: आचारसंहिता म्हणजे काय? त्याची अंमलबजावणी कधीपासून होणार? या कालावधीत कोणते निर्बंध असतील? जाणून घ्या सविस्तर)

दुपारी तीन वाजता एक पत्रकार परिषद

इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आज दुपारी तीन वाजता एक पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल. तत्पूर्वी आयोगाने पत्रकार परिषदेच्या 24 तास अगोदर एक सूचना दिली आहे. ज्यामध्ये मतदानाच्या तारखा, मतदानाचे टप्पे आणि सुरक्षा व्यवस्था, विशेषत: मतदानोत्तर हिंसाचार किंवा माओवादी बंडखोरी प्रवण असलेल्या प्रदेशांमध्ये मतदानप्रक्रिया कशी केली जाईल याबाबत खुलासा केला जाईल. (हेही वाचा -Lok Sabha Elections 2024 Dates Announcement Update: लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा 16 मार्चला दुपारी 3 वाजता होणार जाहीर)

दरम्यान, निवडणूक आयगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी मुहूर्त ठरवला असला तरी त्याबाबत अनेक आव्हाने आणि वाद निर्माण झाले आहेत. आयोगातील आयुक्तपदाच्या दोन रिक्त जागांवर ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांची निवड झाल्यानंतर पुढच्या काहीच तासांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होत आहे. दुसऱ्याय बाजूला या दोघांच्या नियुक्तीला न्यायालयात आव्हानही देण्यात आले होते. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांच्या नियुक्त्या थांबवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कधी नव्हे ते या वेळी निवडणूक आयोग आणि प्रक्रिाही चर्चेत आहे.