दिल्ली विधानसभा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता, निवडणूक आयोगाने बोलावली पत्रकार परिषद

त्यामुळे घटनात्मक तरतुदीनुसार येत्या 15 फेब्रुवारी 2020 पर्यंत राजधानी दिल्लीमध्ये नवे सरका सत्तेते येणे आवश्यक आहे. गेल्या वेळी 14 फेब्रुवारी 2015 या दिवशी दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आले होते.

Election Commission of India. File Image. (Photo Credits: PTI)

Delhi Assembly Election 2020: दिल्ली विधानसभा निडणुकीची घोषणा भारतीय निवडणूक आयोग (Election Commission of India) आज (6 जानेवारी 2020) करण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली जाऊ शकते. या निवडणूक कार्यक्रमात उमेदवारी अर्ज भरण्याती तारखी, तो मागे घेण्याची तारीख, मतदान आणि मतमोजणी तारखी, वेळ यांसह अचारसंहितेची माहिती दिली जाऊ शकते. राजधानी दिल्लीत सत्ताधारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा आम आदमी पक्ष विरोधात, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस आणि इतर राजकीय पक्ष यांच्यात सामना रंगणार आहे.

राजधानी दिल्लीमध्ये विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी निवडणूक होणार आहे. एकूण 70 सदस्यांच्या दिल्ली विधानसभेत सद्यास्थितीत पक्षीयबलाबल पाहता आम आदमी पक्ष (आप) 62, भाजप 4 आणि इतर पक्षाचे 4 सदस्य आहेत. या आधीच्या विधानसभा निवडणुकीतही नवनिर्वाचीत आम आदमी पक्ष, सत्ताधारी काँग्रेस, विरोधात आसलेला भारतीय जनता पक्ष यांच्यात जोरदार लढाई झाली होती. यात दिल्लीकर जनतेने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षावर विश्वास दाखवत बहुमताने सत्ता दिली. (हेही वाचा, दिल्ली: प्रशिक्षक माझ्यावर बलात्काराचा प्रयत्न करतो; महिला क्रिकेटपटूची खा. गौतम गंभीर यांच्याकडे तक्रार, ट्विटद्वारे मदतीची मागणी)

एएनआय ट्विट

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या विद्यमान आम आदमी पार्टी सरकारची मुदत येत्या काही काळात संपत आहे. त्यामुळे घटनात्मक तरतुदीनुसार येत्या 15 फेब्रुवारी 2020 पर्यंत राजधानी दिल्लीमध्ये नवे सरका सत्तेते येणे आवश्यक आहे. गेल्या वेळी 14 फेब्रुवारी 2015 या दिवशी दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आले होते.