Election: ऐकावं ते नवलचं! निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवारास मिळाले दोन कोटी रुपयांची रोख रक्कम आणि चमचमती XUV कार
पराभव मिळाल्यानं या उमेदवाराचा मनोभाव खचुन जावू नये, गावात बंधुभाव टिकूण राहावा यासाठी गावकऱ्यानी सगळे मिळून पैसे जमा करत या उमेदवारास चक्क 2 कोटी अकरा लाखांचं बक्षीस आणि XUV कार भेट दिली.
निवडणुकीचा (Election) धुराळा म्हण्टलं की विजेता होण्यासाठी पाण्यासारखा पैसा उबडतात हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल पण निवडणुक हरल्यावर पराभवी उमेदवार करोडपती होतो हे जरा पचायला जडचं. पण हो अशीचं एक घटना सध्या सोसल मिडीयावर (Social Media) धुमाकुळ घालतं आहे. नुकत्याचं गुजरात (Gujarat), हिमाचल प्रदेश (Himchal Pradesh) येथील निवडणुका (Election) पार पडल्या. निवडणुकीची मोठी रणधुमाळी बघायला मिळाली. विजयी होण्यासाठी प्रत्येक पक्ष शर्तीचे प्रयत्न करताना दिसला. कारण कुणाला ही पराभवाचा मानकरी व्हायचं नाही. पण हरियाणात (Haryana) मात्र पराभवी उमेदवाराने आपली हार हसत हसत कबूल केली असून त्याला दोन कोटी अकरा लाखांचे बक्षीस आणि एक XUV कार मिळाली आहे. तर त्याचं झालं असं की हरियाणा पंचायत निवडणुकीत (Haryana Panchayat Election) हा अजब प्रकार पुढे आला आहे. हरियाणाच्या (Haryana) रोहतक जिल्ह्यातील चिडी गावातील ही घटना आहे.
चिडी (Chidi) गावात नुकत्याचं पंचायत निवडणुक पार पडली. सरपंच पदासाठी असलेल्या या निवडणुकीत काटेकी टक्कर रंगली होती. धर्मपाल हा व्यक्ती देखील या निवडणुकीत (Election) उभा होता पण धर्मपालचा या निवडणुकीत पराभव झाला. पराभव मिळाल्यानं या उमेदवाराचा मनोभाव खचुन जावू नये, गावात बंधुभाव टिकूण राहावा यासाठी गावकऱ्यानी सगळे मिळून पैसे जमा करत या उमेदवारास चक्क 2 कोटी अकरा लाखांचं बक्षीस आणि XUV कार भेट दिली. (हे ही वाचा:-PUSU Election 2022: पाटणा विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत गोळीबार, पत्रकारांना मारहाण; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण)
एवढचं नाही तर हे खास भेट देताना या उमेदवाराचा विशेष सत्कार सोहळा केला. तसेच ग्राम पंचायतीच्या या उमेदवारास खास पद देण्यात येई असी घोषणा करण्यात आली. दरम्यान या उमेदवाराने भावूक होत संपूर्ण गावकऱ्यांचे आभार मानले आणि मी पराभवी नाही तर गावकऱ्यांच्या या प्रेमाचा विजयी झालो आहे अशी भावना धर्मपालने व्यक्त केल्या.