Namibia ते India 16 तासांच्या प्रवासाने 8 चित्ते भारतात येणार; कस्टमाईज्ड B747 Jumbo Jet सज्ज

यामध्ये इंधन भरण्यासाठी थांबा नसेल. हा निर्णय चित्त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेतला आहे.

cheetahs | Pixabay.com and Twitter

भारतामध्ये  आफ्रिकेमधून 8 चित्ते (Cheetahs) आणण्यासाठी कस्टमाईज्ड करण्यात आलेले B747 Jumbo Jet सज्ज झाले आहे. भारतात मध्य प्रदेशच्या Kuno National Park मध्ये हे चित्ते ठेवले जाणार आहेत. सध्या सारी तयारी झाली असून Namibian ची राजधानी Windhoek मध्ये हे जम्बो जेट दाखल झाले आहे.

8 चित्ते भारतामध्ये आणले जाणार आहेत त्यामध्ये 5 मादी आणि 3 नर चित्त्यांचा समावेश आहे. inter-continental translocation project द्वारा हे 17 सप्टेंबरला कार्गो एअरक्राफ्टच्या माध्यमातून जयपूर मध्ये आणले जाणार आहेत. जयपूर मधून ते मध्य प्रदेशच्या Kuno National Park मध्ये हेलिकॉप्टर द्वारा नेले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाच्या दिवशी त्यांच्याच हस्ते या चित्त्यांना Kuno National Park मध्ये सोडलं जाईल.

विमानाच्या मुख्य कॅबिनमध्ये चित्त्यांचे पिंजरे ठेवता यावेत यासाठी विशेष बदल करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या सोबत प्रवास करणार्‍या पशू वैज्ञानिकांना प्रवासात चित्त्यांकडे जाण्यासाठी पूर्ण मुभा असणार आहे. हे जेट देखील त्यांच्या प्रतिमेने रंगवण्यात आले आहे. नक्की वाचा: Fact Check: राजस्थानमधील पिपलेश्वर महादेव मंदिरात दररोज रात्री चित्त्याचा परिवार पुजाऱ्यासोबत झोपतो? जाणून घ्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या जुन्या व्हिडिओमागील सत्य.

चित्त्यांच्या प्रवासासाठी खास जेट सज्ज

अल्ट्रा लॉंग रेंज जेट विमान 16 तासांचा थेट प्रवास करणार आहे. यामध्ये इंधन भरण्यासाठी थांबा नसेल. हा निर्णय चित्त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेतला आहे. हा प्रवास चित्ते रिकाम्या पोटी करणार असल्याचीही माहिती एका वरिष्ठ भारतीय वन विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. प्राण्यांना या लांबच्या प्रवासामध्ये मळमळ जाणवू शकते त्यामधून इतर त्रास होऊ शकतात या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.



संबंधित बातम्या

00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif