Eid Milad-Un-Nabi 2020: राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांनी जनतेला दिल्या मिलाद-उन-नबी च्या शुभेच्छा

पीएम मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि राहुल गांधी (Photo Credits-IANS/PTI)

Eid Milad-Un-Nabi 2020:  आज देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात ईद-ए-मिलाद-उन-नबी चा सण साजरा केला जात आहे. प्रत्येक वर्षी पैगंबर मोहम्मद यांच्या जन्मदिवसानिमित्त ईद-ए-मिलाद-उन-नबी साजरी केली जाते. त्यामुळेच आजच्या ईदीच्या दिवशी पीएम नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी ट्विट करत असे म्हटले की, ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या शुभेच्छा. पैगंबर मोहम्मद यांच्या विचाराने प्रेरित होऊन हा दिवस समाजात सद्भाव आणि करुणेच्या भावनेचा प्रसार करावा. सर्वत्र शांती असावी. या विशेष दिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुद्धा ट्विट करत असे म्हटले की, पैगंबर मोहम्मद यांचा जन्मदिन, मिलाद-उन-नबी च्या पाक च्या पार्श्वभुमीवर सर्व देशवासियांना खासकरुन मुस्लिम बांधवांना आणि भगिनींना शुभेच्छा देतो. पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणीनुसार, चला आपण सर्वांनी समाजात आनंद आणि देशाच्या सुखासाठी कार्य करु,

तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुद्धा देशवासियांना या सणानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी असे म्हटले की, ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या दिवसानिमित्त दया आणि बंधुभावाची भावना सर्वांचे मार्गदर्शनक करु शकते. खुप खुप शुभेच्छा!(Eid-e-Milad un Nabi Mubarak Wishes: ईद ए मिलाद उन नबी च्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन एकमेकांस करा ईद मुबारक!)

Tweet:

Tweet:

Tweet:

दरम्यान,इस्लामिक मान्यतांनुसार, या दिवशी पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्म झाला होता. त्यांना इस्लामिक धर्मियांचे संस्थापक मानले जाते. सुन्नी मुस्लिम या दिवशी हजरत मोहम्मद यांच्या पवित्र वचनांचे पठन करतात. तर शिया मुस्लिम हे स्वत:ला मोहम्मद पैगंबर यांचे उत्तराधिकारी मानतात. या दिवशी मस्जिदीत नमाज अदा केली जाते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif