Economic Survey for 2022-23: भारताचा आर्थिक पाहणी अहवाल आज सादर होणार; जाणून घ्या वैशिष्ट्ये
मात्र, आता ही प्रतिक्षा संपली आहे. आजपासून (31 जानेवारी) संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकार आर्थिक सर्वेहक्षण अहवाल ( Economic Survey For 2023) सादर करणार आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प ( Union Budget 2022-23) कधी सादर होतो याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते. मात्र, आता ही प्रतिक्षा संपली आहे. आजपासून (31 जानेवारी) संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकार आर्थिक सर्वेहक्षण अहवाल ( Economic Survey For 2023) सादर करणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा आर्थिक कल देशाला समजू शकणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) संसदेत अर्थसंकल्पपूर्व दस्तऐवज ( pre-Budget Document) सादर करतील.
आर्थिक पाहणी अहवाल अर्थ मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभागाच्या आर्थिक विभाग तयार करतो. हा अहवाल मुख्य आर्थिक सल्लागारांच्या देखरेखेखाली तयार होतो. व्ही अनंथा नागेश्वरन हे सध्या देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. आर्थिक सर्वेक्षण दस्तऐवज, अर्थव्यवस्थेची स्थिती आणि सध्याच्या विविध निर्देशकांची माहिती दिली जाते. यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालात आर्थिक वर्ष 2022-23 (एप्रिल-मार्च) आणि पुढील वर्षाचा दृष्टीकोन, दिशा स्पष्ट केली जाते. (हेही वाचा, Budget 2023 Date Time: सर्वसाधारण अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण कधी आणि किती वाजता होणार; सर्व काही येथे जाणून घ्या)
आर्थिक पाहणी अहवालाचे वैशिष्ट्य म्हणजे तो संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला सादर होतो. जेणेकरुन पुढच्या एकदोन दिवसात सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाची दिशा नेमकी कशी असू शकते याचा अंदाज देतो. हा अहवाल पूर्णपणे आर्थसंकल्पावर भाष्य करत नसला तरी त्यातून अर्थसंकल्पाबाबत बरीचशी माहिती प्राप्त होते.
देशातील पहिले आर्थिक सर्वेक्षण 1950-51 मध्ये अस्तित्वात आले, जेव्हा ते अर्थसंकल्पाच्या दस्तऐवजांचा एक भाग असायचे. 1960 च्या दशकात, ते अर्थसंकल्पीय दस्तऐवजांपासून वेगळे केले गेले आणि केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधीच्या दिवशी सादर करण्यात येऊ लागले.