Earthquake In Gujarat: भूकंपाने हादरले गुजरात; सौराष्ट्र, अहमदाबाद, राजकोट येथे 5.5 रिस्टर स्केलचे धक्के

या भूकंपाने गुजरातचे मोठे नुकसान झाले होते. भूज भूकंप नावाने ओळखला जाणारा हा भूकंप 26 जानेवारी 2001 मध्ये आला होता. संपूर्ण भारत 51 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात गुंतला होता. दरम्यान, त्याच दिवशी सकाळी 08.46 वाजता भूकंप आला आणि तो 2 मिनीटांपेपक्षा अधिक कालावधीपर्यंत राहिला.

Earthquake. (Photo Credits: PTI)

संपूर्ण भारतातील राज्यांप्रमाणेच कोरोना व्हायरस संकटाचा सामना करत असलेले गुजरात (Gujarat) राज्य आज भूकंपाच्या धक्क्यांनी हादरुन (Earthquake In Gujarat) गेले. भूकंपमापन यंत्रावर 5.5 इतकी या भूंकंपाची नोंद झाली. भूकंपाचे धक्के जानवताच नागरिकाची भीतीने गाळण उडाली. लोकांनी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडत रिकाम्या जागेचा आश्रय घेतला. ज्यांना असे करणे शक्य झाले नाही त्यांनी घरातीलच डेबल, चौकट, पलंग आदींखाली आश्रय घेतला.

काही दिवसांपूर्वीच दिल्ली-एनसीआर आणि उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर गुजरातमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये भूकंपाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दिल्ली एनसीआर परिसरात तर गेल्या दीड महिन्यात 11 वेळा भूकंपाच धक्के जानवले.

ट्विटर

दरम्यान, या आधी 2001 मध्ये गुजरातमध्ये मोठा भूकंप आला होता. या भूकंपाने गुजरातचे मोठे नुकसान झाले होते. भूज भूकंप नावाने ओळखला जाणारा हा भूकंप 26 जानेवारी 2001 मध्ये आला होता. संपूर्ण भारत 51 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात गुंतला होता. दरम्यान, त्याच दिवशी सकाळी 08.46 वाजता भूकंप आला आणि तो 2 मिनीटांपेपक्षा अधिक कालावधीपर्यंत राहिला. या भूकंपाचे केंद्र गुजरात येथील कच्छ जिल्ह्यातील भचौ तालुक्यातील चाबारी गावापासून 9 किलोमीटर अंतरावर होता.