दिल्ली, उत्तर प्रदेशात भूकंपाचा झटका; पाकिस्तान मध्ये 300 जखमी 19 ठार
दिल्ली, पंजाब हरियाणा सह उत्तर प्रदेशात व पाकिस्तान मध्ये आज (24 सप्टेंबर) रोजी दुपारच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले, सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचे सर्वाधिक पडसाद पाकिस्तान जवळील सीमाभागात उमटले असून यामध्ये तब्बल १९ जण ठार व ३०० जण गंभीर जखमी झाले आहेत.
दिल्ली (Delhi), पंजाब (Punjab) हरियाणा (Hariyana) सह उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) व पाकिस्तान (Pakistan) मध्ये आज (24 सप्टेंबर) रोजी दुपारच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले, सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, या भूकंपा (Earthquake) चे सर्वाधिक पडसाद पाकिस्तान जवळील सीमाभागात उमटले असून यामध्ये तब्बल 19 जण ठार व 300 जण गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय पाकिस्तान मधून समोर आलेल्या काही दृश्यात रस्त्याना सुद्धा मोठाले तडे गेल्याचे दिसून येत आहे. मीरपूर जवळील पाकिस्तान व्याप्त काश्मीर येथील जाटलान परिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू असून 6.1 रिश्टर स्केल इतक्या तीव्र प्रमाणात भुकंम्पाचे हादरे बसले आहेत.
हरियाणा, पंजाब, दिल्ली, काश्मीर, हिमाचल प्रदेशमधील वेगवेगळ्या भागात भूकंपाचे धक्के बसले. काश्मीरमधील राजौरी, पुंछ, जम्मू, उधमपूर आणि रामबनमधील काही भागात भूकंपाचे धक्के बसल्याचे नागरिकांनी सांगितले.यावेळी अचानक उदभवलेल्या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ANI ट्विट
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पालघर मध्ये सुद्धा 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे हादरे बसले होते. यावेळेस सुद्धा नागरिकांना भीतीने घर सोडून निघावे लागले होते.