Tyrosinemia Type 1, Gaucher’s Disease, Wilson’s Disease, आणि Dravet-Lennox Gastaut Syndrome 4 दुर्मिळ आजारांवर आता औषध स्वदेशी बनावटीची मिळणार; किंमत 100 पटीने खाली

Tablet Sapropterin जे Phenylketonuria, tab Sodium Phenyl Butyrate and tablet Carglumic Acid जे Hyperammonemia आणि Capsule Miglustat जे Gaucher’s disease साठी आहे त्यांच्यासाठी देखील सध्या प्रक्रिया सुरू आहे.

Medicines प्रतिकात्मक प्रतिमा (Photo Credits-File Image)

भारत सरकार सोबत भारतीय औषध निर्माण कंपन्यांनी रूग्णांना एक मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे 4 दुर्मिळ आजारांवरील औषधांचा खर्च आता 100 पट कमी करण्यात यश आलं आहे. Tyrosinemia Type 1, Gaucher’s Disease, Wilson’s Disease, आणि Dravet-Lennox Gastaut Syndrome या 4 आजारांवर आता 'मेड इन इंडिया' औषधं उपलब्ध झाली आहेत. हे चारही दुर्मिळ आजार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आता भारतीय फार्मा कंपन्या आता महागड्या आयात केलेल्या फॉर्म्युलेशनवर अवलंबून न राहता औषधं बनवू शकणार आहेत.

केंद्र सरकारने sickle cell anemia सह 13 दुर्मिळ आजारांशी संबंधित कारवाईला प्राधान्य दिल्याने किमतीत घट झाली आहे. शैक्षणिक संस्था, फार्मा इंडस्ट्रीज, संस्था, CDSCO, फार्मास्युटिकल्स विभाग यांच्याशी सखोल चर्चा केल्यानंतर जुलै 2022 मध्ये अत्यंत आवश्यक असलेला पुढाकार घेण्यात आला होता. त्यामुळे आता सिकल सेल अ‍ॅनिमिया सह चार अन्य दुर्मिळ आजारांवरील औषधांना मान्यता देण्यात आली आहे आणि ती स्वदेशी तयार केली जात आहेत.

Tablet Sapropterin जे Phenylketonuria, tab Sodium Phenyl Butyrate and tablet Carglumic Acid जे Hyperammonemia आणि Capsule Miglustat जे Gaucher’s disease साठी आहे त्यांच्यासाठी देखील सध्या प्रक्रिया सुरू आहे. या 3 आजारांवरील 4 औषधांना एप्रिल 2024 मध्ये मान्यता मिळू शकेल असा अंदाज आहे.

Tyrosinemia Type 1 या आजारावर दिल्या जाणार्‍या Nitisinone capsules च्या किंमतीमध्ये ते आयात करताना जितकी किंमत मोजावी लागत होती त्याच्या 100 पट किंमत कमी करण्यात आली आहे. आयात केलेल्या कॅप्सूलची वर्षाची किंमत 2.2 कोटी रुपये आहे, तर तर देशांतर्गत उत्पादित कॅप्सूल आता फक्त 2.5 लाख रुपयांना उपलब्ध असतील अ‍से सूत्रांनी सांगितल्याचं समोर आलं आहे.