Droupadi Murmu Swearing In Ceremony: द्रौपदी मुर्मू आज भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून घेणार शपथ
भारताचे सरन्यायाधीश NV Ramana मुर्मूंना राष्ट्रपतीपदाची शपथ देतील.
Droupadi Murmu आज भारताच्या नव्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहे. 15व्या राष्ट्रपती पदी पसणार्या मुर्मू या आदिवासी समाजातील पहिल्या स्त्री आहे ज्यांना देशातील सर्वोच्च राजकीय स्थान दिले जात आहे. रामनाथ कोविंद यांच्यानंतर देशाच्या राष्ट्रपती पदाची सूत्र सांभाळण्यासाठी त्या संसदेच्या सेंट्रल हॉल मध्ये आज शपथ घेणार आहेत.
द्रौपदी मूर्मू यांच्यासोबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला असतील. सेंट्रल हॉलमध्ये पोहचताच जन-गण-मन वाजवलं जाईल. त्यानंतर भारताचे सरन्यायाधीश NV Ramana मुर्मूंना शपथ देतील. सकाळी 10.15 च्या सुमारास हा शपथविधी सोहळा सुरू होणार आहे. तत्पूर्वी आज सकाळी त्यांनी दिल्लीत राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतले आहे. Draupadi Murmu Oath Ceremony: राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांचा 25 जुलैला शपथविधी सोहळा, जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम.
22 जुलै दिवशी युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव करत द्रौपदी मूर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या. 18 जुलै दिवशी देशभर झालेल्या मतदानामध्ये मुर्मू यांना 2824 मतं ज्यांचं मूल्य 6,76,803 होते. तर सिन्हा यांना 1877 मतं ज्यांचं मूल्य 3,80,177 होतं. एकूण 4809 खासदार, आमदारांनी मतदान केले आहे.
द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू आहे. द्रौपदी मुर्मू यांनी आपली राजकीय कारकीर्द एक नगरसेवक म्हणून सुरू केली होती. नंतर त्या रायरंगपूर राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या उपाध्यक्षा झाल्या. पुढे त्या 2013 मध्ये, पक्षाच्या एसटी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्याच्या पदापर्यंत पोहोचल्या.
ओडिशातील भाजपच्या दोन वेळा आमदार राहिलेल्या, द्रौपदी मुर्मू नवीन पटनायक मंत्रिमंडळात मंत्री होत्या. त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने बिजू जनता दल किंवा बीजेडी सत्तेत होते. त्या 6 मार्च 2000 ते 6 ऑगस्ट 2002 पर्यंत वाणिज्य आणि वाहतूक या स्वतंत्र प्रभारासह आणि 6 ऑगस्ट 2002 ते 16 मे 2004 पर्यंत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री होत्या.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)