DIPCOVAN: DRDO ने विकसित केलं अँटीबॉडी टेस्ट किट; COVID-19 चे निदान लवकर होण्यास मदत
डीपकोविन असं या कीटचं नाव असून अंटीबॉडीज तपासण्यास ते मदत करतं.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (Defence Research and Development Organisation) अँटीबॉटी टेस्ट किट (Antibody Test Kit) विकसित केलं आहे. डीपकोविन (DIPCOVAN) असं या किटचं नाव असून अंटीबॉडीज तपासण्यास ते मदत करतं. या किटमुळे कोविडच्या संसर्गाचे निदान सुरुवातीच्या टप्प्यात करणे शक्य होईल. डीपकोविन हे अँटीबॉडी मायक्रोवेल एलिसा (Microwell ELISA) असून डिफेन्स इंस्टीट्युट ऑफ फिजियोलॉजी अँड अलाईड सायन्स (Defence Institute of Physiology and Allied Sciences) यांनी दिल्ली स्थित Vanguard Diagnostics साथीने बनवले आहे
DRDO ने दिलेल्या माहितीनुसार, या कीटचा वापर SARS-CoV-2 व्हायरसच्या nucleocapsid प्रोटीनचे निदान करण्यास मदत करतो. या कीटची सेन्सिटीव्हीटी 97 टक्के तर स्पेसिफिसिटी 99 टक्के इतकी आहे. या कीटची निर्मिती वैज्ञानिकांनी केली असून दिल्लीमधील विविध कोविड हॉस्पिटल्सच्या 1000 हून अधिक पेशन्टचे सॅपल्स यात तपासण्यात आले आहेत.
या किटचे गेल्या वर्षभरामध्ये तीन वेगवेगळ्या बॅचेसमध्ये व्हॅलिडेशन झाले. एप्रिल 2021 मध्ये आयसीएमआरने या अँटीबॉडी टिडेक्शन कीटला मान्यता दिली. आता मे 2021 डीसीजीआय, सीडीएससीओ आणि आरोग्य मंत्रालयाकडून मान्यता मिळाली आहे. त्यानंतर आता हे कीट विक्रीसाठी उपलब्ध होईल. (COVID-19 Home Testing Kit: कोविड-19 च्या होम टेस्ट किट 'कोविसेल्फ' चा कोण आणि कसा वापर करु शकता? पहा Video)
डीपकोविन हे मानवी शरीरातील सिरम किंवा प्लाझ्मा मधील IgG अँटीबॉडीज डिटेक्ट करतो. या कीटद्वारे टेस्ट करण्यासाठी केवळ 75 मिनिटांचा कालावधी लागतो. हे कीट तयार केल्यापासून दीड वर्षापर्यंत व्हॅलिड राहू शकते.
Vanguard Diagnostics कडून हे किट जूनच्या पहिल्या आठवड्यात विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते. पहिल्या आठवड्यात 100 कीट्स लॉन्च केले जातील. तर त्यापुढे दरमहिन्याला 500 कीट्सची निर्मिती केली जाईल. एका किटमागे 100 टेस्ट करता येऊ शकतील आणि या कीटची किेंमत 75 रुपये प्रति टेस्ट इतकी असू शकते.