Dr. Padmavati Sivaramakrishna Iyer, पहिल्या भारतीय महिला कार्डिओलॉजिस्ट चा COVID 19 मुळे वयाच्या 103 व्या वर्षी निधन
भारताच्या पहिल्या महिला कार्डिओलॉजिस्ट Dr. Padmavati Sivaramakrishna Iyer यांचे कोविड 19 मुळे निधन झाले आहे. त्या 103 वर्षांच्या होत्या.
भारताच्या पहिल्या महिला कार्डिओलॉजिस्ट Dr. Padmavati Sivaramakrishna Iyer यांचे कोविड 19 मुळे निधन झाले आहे. त्या 103 वर्षांच्या होत्या. दरम्यान 11 दिवसांपूर्वी त्यांना दिल्लीच्या National Heart Institute (NHI)मध्ये दाखल करण्यात आले होते मात्र उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ऑक्सिजन सपोर्टवर असणार्या पदमावती यांची प्रकृती शनिवार सकाळ पर्यंत ठील होती. मात्र नंतर ऑक्सिसन सॅच्युरेशन खालवले. त्यानंतर त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले मात्र रात्री त्यांचे निधन झाले असे वृत्त HT कडून देण्यात आले आहे.
म्यानमार मध्ये जन्मलेल्या Dr. Padmavati Sivaramakrishna Iyer दुसर्या महायुद्धाच्या वेळेस भारतामध्ये आल्या. त्यांनी दिल्लीमध्ये Govind Ballabh Pant hospital मध्ये पहिले कार्डिएक केअर युनिट स्थापन केले होते.
‘Godmother of cardiology’ असा त्यांचा उल्लेख केला जातो. दरम्यान शरीराने त्या थकल्या असल्याने व्हिल चेअरवर होत्या. परंतू 100 री पार गेलेल्या वरम्माकृष्णा अय्यर पदमावती यांची स्मरणशक्ती अजूनही तल्लख होती. rheumatic heart disease वर त्यांनी अभ्यास केला होता.
पद्मावती यांनी Rangoon Medical College मधून एमबीबीएसचे शिक्षण घेतले होते तर अमेरिकेमध्ये Sodersjukhuset hospital in Stockholm, John Hopkins आणि Harvard Medical School मध्ये ट्रेनिंग घेतले होते. Royal College of Physicians of London च्या त्या शिष्या होत्या. भारतामध्ये पद्मभूषण आणि पद्म विभूषण या दोन नागरी पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)