Cooking Gas Price Hike: घरगुती गॅस सिलेंडर्सच्या किंमतींमध्ये 50 रूपयांची वाढ; 14.2 किलोच्या सिलेंडरसाठी मोजावे लागणार Rs 949.50 - सूत्रांची माहिती
दरम्यान नोव्हेंबर 2021 पासून पहिल्यांदाच पेट्रोल आणि डिझेलच्या दरांतही 80 पैसे प्रति लीटरची वाढ नोंदवण्यात आल्याने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत.
भारतामध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमती (Domestic Cooking Gas LPG Price) वाढली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आता घरगुती गॅस सिलेंडर 50 रूपयांनी महागला आहे. 6 ऑक्टोबर 2021 नंतर मुंबई (Mumbai), दिल्ली (Delhi) आणि अन्य शहरांमध्ये पहिल्यांदाच गॅस सिलेंडर किंमतींमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. दरम्यान मागील काही महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजरात किंमती वाढत असल्या तरीही सरकारकडून गॅस सिलेंडरचे दर स्थिरच ठेवण्यात आले होते पण आता इंधनदरांचा भडका उडाला आहे.
देशाची राजधानी दिल्ली मध्ये घरगुती 14.2 किलो नॉन सब्सिडाईज्ड एलपीजी गॅस सिलेंडरसच्या दरात 899.50 वरून दर 949.5 वर पोहचले असल्याची माहिती OMC ने दिली आहे. तर मुंबई मध्येही नव्या दरानुसार गॅस सिलेंडरची किंमत Rs 949.50 झाली आहे.
दरम्यान नोव्हेंबर 2021 पासून पहिल्यांदाच पेट्रोल आणि डिझेलच्या दरांतही 80 पैसे प्रति लीटरची वाढ नोंदवण्यात आल्याने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत. हे देखील नक्की वाचा: Petrol-Diesel Prices Today: 4 महिन्यांनंतर भारतात पेट्रोल,डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनदर .
19 किलो कमर्शिअल सिलेंडर ची किंमत आता 2003.50 आहे. एलपीजी गॅस सिलेंडरसच्या किंमती दर महिन्याला अंदाजे महिन्याच्या सुरूवातीला बदलले जातात.