Dombivli Crime: डोंबिवलीत धक्का लागल्यानंतर फेरीवाल्याला धक्का लागल्याच्या जाब विचारल्याने इंजिनिअरला मारहाण
काही दिवसांपूर्वी तो काही कामानिमित्त डोंबिवली स्टेशन मधबन टॉकिज परिसरात गेला होता. त्या ठिकाणाहून जात असताना एका फेरीवाल्याचा धक्का लागला.
डोंबिवलीत (Dombivali) इंजिनिअर असलेल्या एका तरुणाला फेरीवाल्याचा धक्का लागला. तरुणाने त्या फेरीवाल्याला जाब विचारला. त्यामुळे संतापलेल्या चार ते पाच फेरीवाल्यांनी मिळून या तरुणाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर हा तरुण जखमी झाला आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांत तरुणाने तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणातील आरोपी फेरीवाल्यांना पोलीस शोध घेत आहेत. (Dombivali Shocker: डोंबिवली मध्ये पोलिसांच्या सतर्कतेने दिल्लीच्या निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती टळली; 40 वर्षीय महिलेवर रिक्षाचालकाचा बलात्काराचा प्रयत्न)
डोंबिवली श्रीखंडेवाडी परिसरात सुधीर पगारे हा तरुण त्याच्या कुटुंबासह राहतो. काही दिवसांपूर्वी तो काही कामानिमित्त डोंबिवली स्टेशन मधबन टॉकिज परिसरात गेला होता. त्या ठिकाणाहून जात असताना एका फेरीवाल्याचा धक्का लागला. सुधीर याने त्याला जाब विचारल्याने फेरीवाल्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. सुधीरने फेरीवाल्यांवर आरोप करत पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलीस सध्या फेरीवाल्यांचा शोध घेत आहे.
दरम्यान, कल्याण महापालिकेचे आयुक्त इंदूराणी जाखड यांनी स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी शहराला वॉकेबल सिटी करण्यासाठी जे काही करता येईल.ते आम्ही करणार असा दावा केला होता. परंतु त्यांच्या या दाव्याची पोलखोल झाली आहे. फेरीवाल्यांसमोर महापालिका प्रशासन,राजकीय पक्ष हतबल झाल्याचे दिसून येत आहे.