Digital Rape Case: सहा वर्षाच्या मुलीसोबत 'डिजिटल रेप', नराधमास अटक
मुलीच्या आईची तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी ओरोपीस अटक केली.
उत्तर प्रदेश राज्यातील गाझियाबाद (Ghaziabad) येथून पोलिसांनी एका व्यक्तीस अटक केली आहे. या व्यक्तीवर शेजारीच राहणाऱ्या सहा वर्षांच्या मुलीसोबत डिजिटल रेप (Digital Rape) केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपीस कानवानी (Kanawani) परिसरातून ताब्यात घेतले. आरोपीविरोधात पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली होती. या तक्रारीवरुनच गुन्हा दाखल करत पोलिसांनी सदर व्यक्तीस अटक केली आहे. मुलीच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपीने तिच्या मुलीवर “डिजिटल बलात्कार” (पुरुष जननेंद्रियाशिवाय शरीराच्या कोणत्याही भागाचा वापर करून जबरदस्तीने लैंगिक संबंध) केला. मुलीच्या आईची तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी ओरोपीस अटक केली. अजय उर्फ राम नरेश असे आरोपीचे नाव असल्याचे समजते.
पोलिसांनी प्राप्त तक्रारीच्या आधारे आरोपी अजय उर्फ राम नरेश याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 376AB (12 वर्षांखालील मुलीवर लैंगिक अत्याचार) आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायदा (POCSO) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी माहिती देताना म्हटले की, पीडित मुलीची आई सकाळी घरी आली तेव्हा पीडिता आईच्या कुशीत शिरली आणि तिला मिठी मारुन रडू लागली. आईने रडण्याचे कारण विचारले असता पीडितेने तिच्यासोबत घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर पीडितेच्या आईने पोलिसांमध्ये तक्रार दिली. (हेही वाचा, Digital Rape: डिजिटल बलात्कार म्हणजे काय? जाणून घ्या)
पोलिसांनी पुढे सांगितले की, आरोपी अजय हा घटनास्थळावरुन कन्नौज जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान, पोलिसांनी 30 आणि 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्री त्याला अटक केली.