DHFL Bank Scam: 34000 कोटींच्या बँक घोटाळ्या प्रकरणी DHFL चे माजी संचालक धीरज वाधवान यांना अटक, CBI ची कारवाई
आज त्यांना दिल्ली विशेष कोर्टात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने धीरज वाधवान यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सीबीआयने 34000 कोटी रुपयांच्या 17 बँकांच्या कन्सोर्टियमच्या घोटाळ्याप्रकरणी यापूर्वीच गुन्हा दाखल केला आहे.
डीएचएफएल (DHFL) बँक गैरव्यवहार प्रकरणी धीरज वाधवान (Dheeraj Wadhawan) यांना सीबीआयने (CBI) अटक केली आहे. त्यांच्यावर 34 हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. वाधवान यांच्या विरोधात सीबीआयने (Central Bureau of Investigation) 2022 मध्ये आरोपपत्र दाखल केलं होतं. याप्रकरणी सीबीआयने डीएचएफएलचे माजी संचालक धीरज वाधवन यांना अटक केली. धीरज वाधवनला अटक करत दिल्लीतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये केली आहे. (हेही वाचा - Elgar Parishad Case: एल्गार परिषद प्रकरणात गौतम नवलखा यांना जामीन मंजूर; नजरकैदेतील सुरक्षेसाठी 20 लाख रुपये देण्याचे आदेश)
याप्रकरणी सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. आज त्यांना दिल्ली विशेष कोर्टात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने धीरज वाधवान यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सीबीआयने 34000 कोटी रुपयांच्या 17 बँकांच्या कन्सोर्टियमच्या घोटाळ्याप्रकरणी यापूर्वीच गुन्हा दाखल केला आहे. देशातील बँकिंग इतिहासातील ही सर्वात मोठी फसवणूक मानली जात आहे. याआधीही सीबीआयने येस बँक घोटाळ्याप्रकरणी धीरज वाधवनला अटक केली होती आणि सध्या ते जामिनावर बाहेर होते.
फेब्रुवारी 2024 मध्ये, सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने म्हणजेच सेबीने (SEBI) 22 माजी डीएचएफएलचे प्रमोटर्स (Promoters) धीरज वाधवान आणि कपिल वाधवान यांची बँक खाती तसेच शेअर्स आणि म्युच्युअल फंड होल्डिंग्स संलग्न करत लाख रुपयांची थकबाकी वसूल केली होती. वाधवान बंधूंनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या वर्षी जुलैमध्ये त्यांच्यावर लावण्यात आलेला दंड भरण्यात अयशस्वी झाल्यानंतर बाजार नियामक कडून हे पाऊल उचलण्यात आलं होतं.