Effects of Dengue on Human Body: डेंग्यू आजाराचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञ काय सांगतात? घ्या जाणून

भारतात मान्सून दरम्यान वाढते डेंग्यू रुग्ण आरोग्यविषयक चिंता निर्माण करतात. या आजाराची लागण मानवी शरीरात न्यूरोलॉजिकल गुंतागुंत निर्माण करते. त्यामुळे आजाराचे लवकर निदान आणि डासांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

Mosquito | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

मान्सून आणि डेंग्यू उद्रेक (Dengue Cases in India) हे जवळपास समिकरणच जणू. पावसाळ्यात डेंग्यू आजार मोठ्या प्रमाणावर डोके वर काढतो. पण, इतर ऋतुंमध्येही या आजाराचे रुग्ण पाहायला मिळतात. खास करुन हा आजार मान्सूनच्या काळात कर्नाटक, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, दिल्ली आणि महाराष्ट्र यासह अनेक राज्यांमध्ये आढळतो. अभ्यास सांगतात की, हा आजार वाटतो तितका साधा नाही. त्याचे मानवी मेंदू (Dengue Can Affect The Brain) आणि शरीरावर दुरगामी परिणाम होऊ शकतात. तज्ज्ञांनी डेंग्यूचा गंभीर न्यूरोलॉजिकल परिणाम (Dengue Can Affect Nervous System) अधोरेखित केला आहे. हा परिणाम भारतात अधिक प्रमाणात दिसुन आल्याचेही दिसून आल्याचे अभ्यासक सांगतात.

न्यूरोलॉजिकल गुंतागुंत अनेकदा दुर्लक्षित

डेंग्यू प्रामुख्याने फ्लूसारखी (ताप) लक्षणे निर्माण करण्यासाठी ओळखला जातो. परंतु त्याचा न्यूरोलॉजिकल परिणाम खोलवर आणि वारंवार दुर्लक्षित केला जातो, असे गुरुग्राम येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील न्यूरोलॉजीचे मुख्य संचालक आणि प्रमुख डॉ.प्रवीण गुप्ता आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगतात. डॉ. गुप्ता यांनी स्पष्ट केले की डेंग्यूचे न्यूरोलॉजिकल प्रकटीकरण कमी सामान्य असले तरी, त्यात मेंदूज्वर, मेंनिंगिटिस आणि मायलाईटिस यांचा समावेश आहे. डास चावल्याने निर्माण हणारा विषाणू रक्त-मेंदूच्या अडथळ्याला पार करतो तेव्हा ही परिस्थिती उद्भवते. ज्यामुळे मेंदू आणि पाठीच्या मज्जातंतूची जळजळ आणि संसर्ग होतो, असे त्यांनी नमूद केले. (हेही वाचा, IIL-ICMR MoA For Zika Vaccine: इंडियन इम्युनोलॉजिकल लिमिटेड आणि आयसीएमआर करणार झिका लस निर्मिती, एमओएवर स्वाक्षरी)

डेंग्यूमुळे इतरही अनेक दुष्परिणाम

गंभीर डेंग्यू असलेल्या रुग्णांना डोकेदुखी, बदललेली मानसिक स्थिती, दौरे आणि अगदी कोमा यासारख्या लक्षणांचा अनुभव येऊ शकतो. या विषाणूचा न्यूरोट्रॉपिक स्वभाव त्याला थेट मज्जासंस्थेच्या पेशींना संक्रमित करण्यास सक्षम करतो, ज्यामुळे जळजळ आणि नुकसान होते. याव्यतिरिक्त, संसर्गामुळे उद्भवणारी रोगप्रतिकारक प्रतिक्रिया या मज्जासंस्थेच्या समस्या वाढवू शकते, ज्यामुळे उपचार गुंतागुंतीचे होऊ शकतात. (हेही वाचा, Anand Mahindra Shares Mosquito-Killing Device: डास मारण्याची ही तोफ कोठे शोधायची? आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडिया शेअर केले खास उपकरण)

डेंग्यूचा प्रसार आणि मान्सूनची भूमिका

डेंग्यू हा एक वेक्टर-जनित आजार आहे जो संक्रमित एडीस डासाच्या चाव्यामुळे पसरतो. हा विषाणू 100 पेक्षा जास्त देशांमध्ये आढळतो आणि दरवर्षी जगभरात सुमारे 400 दशलक्ष लोकांना प्रभावित करतो. भारतात, डेंग्यूच्या प्रकरणांमध्ये मान्सूनच्या हंगामात डासांसाठी आदर्श प्रजनन परिस्थिती, जसे की स्थिर पाणी आणि वाढलेली आर्द्रता यामुळे सामान्यतः वाढ होते. (हेही वाचा, Dengue Outbreak in West Bengal: डासांनी गच्च भरलेली पिशवी घेऊन रुग्ण दवाखण्यात, पश्चिम बंगालमध्ये डेंग्यू उद्रेकाची भीती)

मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम

डेंग्यूमुळे मज्जासंस्थेसह शरीराच्या विविध भागांवर परिणाम होऊ शकतो", असे बेंगळुरूच्या एस्टर आरव्ही हॉस्पिटलमधील न्यूरोलॉजीचे प्रमुख वरिष्ठ सल्लागार डॉ.श्रीकांता स्वामी यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की जेव्हा मज्जासंस्था गुंतलेली असते, तेव्हा रुग्णांना मेंदूच्या तापासारखी लक्षणे दिसून येतात, जसे की बदललेली चेतना, बोलण्यात अडचण, स्ट्रोक, दौरे किंवा कमी प्लेटलेट्समुळे मेंदूतील रक्तस्त्राव. सर्वज्ञात आहे की, जेव्हा प्लेटलेटची पातळी कमी होते, तेव्हा मेंदूसह शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो. डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णाला प्लेटलेटची पातळी कमी असेल तर यामुळे मज्जासंस्थेमध्ये गंभीर गुंतागुंत होऊ शकते, असे डॉ.स्वामी यांनी सांगितले.

डेंग्यूशी संबंधित न्यूरोलॉजिकल गुंतागुंत लवकर ओळखणे आणि वैद्यकीय हस्तक्षेप होणे महत्वाचे आहे. विशेषतः मान्सूनच्या महिन्यांत जेव्हा संसर्ग शिखरावर असतो. डेंग्यूच्या रुग्णांमध्ये न्यूरोलॉजिकल लक्षणांवर बारीक लक्ष ठेवण्याचे आवाहन आरोग्य सेवा प्रदात्यांना केले जाते. पावसाळ्यात डेंग्यूचा न्यूरोलॉजिकल आरोग्यावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी डासांवर नियंत्रण ठेवणे. साचलेल्या पाण्याचे निर्मूलन करणे आणि जनजागृती मोहिम यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक आहेत. सतर्कता राखणे आणि सक्रिय पावले उचलणे व्हायरसचा प्रसार कमी करण्यास आणि प्रभावित व्यक्तींमध्ये गंभीर परिणाम रोखण्यास मदत करू शकते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now