प्रसिद्ध Atlas Cycles च्या मालकिणीची गळफास लावून आत्महत्या; 'जीवनात आनंदी नसल्याचा' सुसाईड नोटमध्ये उल्लेख, पोलिसांना मात्र हत्येचा संशय

'अ‍ॅटलस' या प्रसिद्ध सायकल (Atlas Cycles) कंपनीच्या मालकांपैकी एक असलेल्या, संजय कपूरची पत्नी नताशा कपूर (Natasha Kapoor), वय-57 यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे

Representational Image (Photo Credits: Pixabay)

'अ‍ॅटलस' या प्रसिद्ध सायकल (Atlas Cycles) कंपनीच्या मालकांपैकी एक असलेल्या, संजय कपूरची पत्नी नताशा कपूर (Natasha Kapur), वय-57 यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. सुरुवातीच्या तपासात दिल्ली पोलिसांनी ही आत्महत्या (Suicide) असल्याचे म्हटले आहे. परंतु मृत्यूवेळी त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडा असल्याने पोलिसांना वेगळाच संशय येत आहे.

सध्या पोलीस या घटनेचा विविध मार्गांनी तपास करीत आहेत. राजधानी दिल्लीच्या औरंगजेब लेन येथील घरात, पंख्याला लटकलेला त्यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नताशा कपूरने याबाबत एक सुसाईड नोटही लिहिली आहे.

'आपण आपल्या आयुष्यात सुखी नसल्याचे' त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की, आत्महत्येस आर्थिक संकट देखील कारणीभूत ठरू शकते. नवी दिल्ली जिल्ह्यातील तुघलक रोड पोलिस स्टेशन या प्रकरणाचा तपास करत आहे. बुधवारी नताशा कपूर यांचे आरएमएल रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात आले. पोस्टमार्टमनंतर नताशा कपूर यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. बुधवारी लोधी रोडवरील स्मशानभूमीत नताशा कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (हेही वाचा: ठाणे: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकाची वर्तक नगर येथे गळफास लावून आत्महत्या)

संजय कपूर यांचे कुटुंब औरंगजेब लेन, दिल्ली येथे राहत असल्याचे सांगितले जात आहे. मंगळवारी दुपारी त्यांची पत्नी नताशा कपूर यांनी दुपारचे जेवण घेतले नाही, तेव्हा घरातील लोकांनी त्यांचा शोध सुरू केला. संजय कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूर यांनी त्यांना फोन केला असता, नताशा कपूर यांनी फोनही उचलला नाही. यानंतर नताशा कपूरचा मृतदेह एका खोलीत स्नॅपरसह पंख्याला लटकलेला आढळला. त्यानंतर डॉक्टरांना बोलविण्यात आले व डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर मुलगा सिद्धांत कपूर यांनी मंगळवारी संध्याकाळी पोलिसांना याची माहिती दिली.