Delhi Drug Bust: दिल्ली पोलिसांकडून 5,820 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; शहराच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई
दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने 5,820 कोटी रुपयांचे कोकेन जप्त करून आणि महिपालपूरमध्ये चार कार्टेल सदस्यांना अटक करून राजधानीतील आतापर्यंतची सर्वात मोठी अंमली पदार्थ जप्ती केली आहे.
दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) शहराच्या महिपालपूर परिसरात कारवाई करत तब्बल 602 किलो ग्रेड-ए कोकेन जप्त (Delhi Drug Bust) केले आहे. कोलंबियन कोकेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अंमली पदार्थाची बाजारातील किंमत 5,820 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. ही कारवाई 2 ऑक्टोबर रोजी करण्यात आली. पोलिसांनी माहिती देताना सांगितलेकी, राजधानीच्या दिल्ली शहराच्या इतिहासातील आजवरची ही सर्वात मोठी कामगिरी (Narcotics Cartel) आहे. अधिक प्रमाणावर ड्रग्ज जप्त करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थांची तस्करी कोलंबियाहून करण्यात आली होती आणि ते दिल्ली आणि देशाच्या इतर भागात वितरित करण्याच्या उद्देशाने होते. या कारवाईत एका भारतीय नागरिकासह अमली पदार्थांच्या टोळीतील चार प्रमुख सदस्यांना अटक करण्यात आली. तुषार गोयल (40), हिमांशू कुमार (27), औरंगजेब सिद्दीकी (23) आणि भरत कुमार जैन (48) अशी संशयितांची नावे आहेत.
विक्रमी कारवाई
पोलिसांनी या कारवाईदरम्यान 562 किलो कोकेन जप्त केले. ज्याचे अंदाजे रस्त्यावरील मूल्य ₹5,620 कोटी (अंदाजे $667 दशलक्ष) आणि 40 किलो हायड्रोपोनिक मारिजुआना, ज्याचे मूल्य ₹200 कोटी (अंदाजे $24 मिलियन) इतके आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील लोकप्रिय व्यावसायिक क्षेत्र असलेल्या महिपालपूर विस्तारातील एका गुप्त ठिकाणी हे अमली पदार्थ साठवले जात होते. पोलिसांनी म्हटले की, "अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्धच्या लढ्यात कायद्याच्या अंमलबजावणीसाठी हे एक मोठे यश आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केल्याने केवळ भारतभर वितरणच रोखले जात नाही तर, आंतरराष्ट्रीय कार्टेलसाठी एक प्रमुख पुरवठा साखळी देखील खंडीत होते आहे, असे या मोहिमेचे नेतृत्व करणारे अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रमोद सिंग कुशवाह यांनी सांगितले.
कारवाई मोहीमेतील तपशील
- दिल्लीत कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सिंडिकेटविषयीच्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई.
- पोलिसांच्या विशेष कक्षाकडून कारवाई.
- कार्टेलच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी गुप्त अधिकारी तैनात करण्यात आले.
- अनेक आठवड्यांच्या पाळत ठेवल्यानंतर पोलिसांनी महिपालपूर विस्तारातील ठिकाणावर छापा टाकला.
- जप्त केलेला माल देशभरातील अनेक राज्यांमध्ये वितरित करण्यासाठी भारतात तस्करी करून आणण्यात आला होता.
या कारवाईत कार्टेलच्या अंमली पदार्थांच्या तस्करीच्या अनेक अत्याधुनिक पद्धती उघड झाल्या, ज्यात अधिकाऱ्यांकडून शोध टाळण्यासाठी उच्च-तंत्रज्ञानाच्या संवाद साधनांचा वापर केला गेला.
रॅकेटचे आंतरराष्ट्रीय दुवे
प्राथमिक तपासातून असे दिसून आले की, कार्टेलचे सखोल आंतरराष्ट्रीय संबंध होते. विशेषतः दक्षिण अमेरिकन अमली पदार्थ विक्रेत्यांशी. कोलंबियाहून आणलेले कोकेन दिल्लीत पकडण्यापूर्वी तस्करीच्या विविध मार्गांनी भारतात दाखल झाले होते. अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की ते भारत आणि परदेशात कार्टेलच्या कारवाया तपासत असल्याने आणखी अटक होऊ शकतात.
अंमली पदार्थांच्या व्यापाराला मोठा धक्का
"ही प्रचंड जप्ती अंमली पदार्थांच्या व्यापारासाठी एक मोठा धक्का आहे आणि अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्याच्या आमच्या अथक प्रयत्नांचा पुरावा आहे. हे कार्टेल आणि देशभरातील त्याचे वितरकांचे जाळे नष्ट करण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न सुरूच ठेवू ", असे कुशवाह म्हणाले. कार्टेलशी संबंधित इतर व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी अधिकाऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली आहे. अटक केलेल्या चार व्यक्तींची सध्या चौकशी केली जात आहे आणि येत्या काही दिवसांत या कारवाईबाबत अधिक तपशील समोर येण्याची अपेक्षा आहे, असेही या मोहिमेचे नेतृत्व करणारे अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रमोद सिंग कुशवाह यांनी सांगितले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)