CM Arvind Kejriwal Under House Arrest: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली पोलिसांच्या नजरकैदेत- आम आदमी पार्टी

आम आदमी पक्षाचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवले आहे. कोणालाही अरविंद केजरीवाल यांना भेटू दिले नाही. तसेच, त्यांच्या घरातून कोणाला बाहेरही पडू दिले जात नाही. दिल्ली पोलिसांनी आमच्या आमदारांनाही मारहाण केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने लावला आहे.

Arvind Kejriwal | (Photo Credits: Facebook)

आम आदमी पक्षाने (AAP) आरोप केला आहे की, दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( CM Arvind Kejriwal) यांना नजरकैदेत ठेवले आहे. अरविंद केजरीवाल यांनी सिंधू बॉर्डरवर (Singhu Border) जाऊन शेतकरी आंदोलनाला सोमवारी भेट दिली होती. शेतकऱ्यांशी चर्चा केली होती. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आम आदमी पक्षाने केलेलेल्या आरोपांचे खंडण करत म्हटले आहे की, मुख्यमंत्री केजरीवाल हे काल सायंकाळी बाहेर गेले होते. तसेच त्यांना त्यांच्या घरी भेटण्यासाठी कोणालाही मज्जाव करण्या आला नाही.

आम आदमी पक्षाचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवले आहे. कोणालाही अरविंद केजरीवाल यांना भेटू दिले नाही. तसेच, त्यांच्या घरातून कोणाला बाहेरही पडू दिले जात नाही. दिल्ली पोलिसांनी आमच्या आमदारांनाही मारहाण केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने लावला आहे.

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घराबाहेर दिल्ली पोलिसांनी कारणाशिवाय आणि जबरदस्तीने बॅरिकेटींग केले आहे. दिल्ली पोलीस इतक्या पातळीला पोहोचले आहेत की, केजरीवाल यांच्या घरी कामासाठी जाणाऱ्या कामगारांनाही घरात प्रवेश नाकारला जात आहे. दरम्यान, आम्ही सर्वजण मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घराकडे मोर्चा काढणार आहोत तसेच मुख्यमंत्र्यांना नजरकैदेतून बाहेर काढा असे अवाहन करणार आहोत असेही सौरभ भारद्वाज यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Bharat Bandh: शेतक-यांकडून आज पुकारण्यात आलेल्या 'भारत बंद' शी संबंधित 'ही' आहे महत्त्वाची माहिती)

आम आदमी पक्षाने आरोप केला आहे की, दिल्ली पोलीस केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशाने काम करत आहे. गृहमंत्रालयाच्या आदेशावरुनच दिल्ली नगर निगमच्या तीन नगरसेवकांना केजरीवालांच्या घराबाहेर धरणे धरायला लावले आहे. या धरण्यांचा बहाना करुन पोलिसांनी केजरीवाल यांच्या घराबाहेर बॅरिकेटींग केले आहे, असा आरोपही आम आदमी पक्षाने केला आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement