देशात मतदान पार पडल्यानंतर पेट्रोलचे दर 10 पैसे तर डिझेलचे दर 16 पैशांपर्यंत वाढले
त्यानंतर आता लगेच दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त
देशात रविवारी (19 मे) सात टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर आता लगेच दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तर पेट्रोलचे दर हे 8 ते 10 पैसे आणि डिझेलचे दर हे 15 ते 16 पैशांनी वाढले आहे.
मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली असता मतदारांमध्ये याविरुद्ध संताप व्यक्त केला जाणार असल्याचा अंदाज केंद्र सरकारला होता. त्यामुळे निवडणुकीपूर्वी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. परंतु आता पुन्हा पेट्रोल-डिझेलचा भडका उडाला असून याचा फटका सामान्य नागरिकांना बसणार आहे.(तुरडाळीचे भाव चक्क 100 रुपांच्या घरात, सामान्य नागरिकांना बसणार फटका)
आजचे पेट्रोल-डिझेल दर दिल्ली:
> पेट्रोल - 71.03 वरुन 71.12 रुपये प्रतिलीटर
> डिझेल- 65.96 वरुन 66.11 रुपये प्रतिलीटर
आजचे पेट्रोल-डिझेल दर मुंबई:
>पेट्रोल- 76.73 रुपये
>डिझेल- 69.27 रुपये
केंद्र सरकारने सरकारी इंधन कंपन्यांवरील दर निश्चितीचे नियंत्रण हटवल्याने जागतिक बाजारात इंधन दरवाढ होत आहे. तसेच कच्च्या तेलाच्या किंमतीतसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.