Delhi Bhalaswa Fire: दिल्ली येथील भालसवा कचरा डेपोला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल
आगीचे लोळ आकाशात उठत आहेत. मंगळवारी (26 एप्रिल) सायंकाळी 5.47 च्या सुमारास उशीरा भडकलेली ही आग (Delhi Fire) अद्यापही कायम आहे.
राजधानी दिल्ली येथील भलसवा कचरा डेपोला (Bhalaswa Dump Yard Fire)मोठ्या प्रमाणावर आग ( Delhi Bhalaswa Fire) लागली आहे. आगीचे लोळ आकाशात उठत आहेत. मंगळवारी (26 एप्रिल) सायंकाळी 5.47 च्या सुमारास उशीरा भडकलेली ही आग (Delhi Fire) अद्यापही कायम आहे. आगिवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या आणि अनेक जवान घटनास्थळी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
दिल्ली अग्निशमन दलाचे सहाय्यक विभागीय अधिकारी सीएल मीना यांनी माहिती देताना सांगितले की, काल सायंकाळी 5.47 वाजणेच्या सुमारास आम्हाला फोन आला की, भालसवा येथील कचरा डेपोला मोठी आग लागली आहे. सुरुवातीला फक्त धूरच होता पण नंतर वाऱ्यामुळे आग भडकली. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी हजर आहेत. आग निवासी भागात पसरू नये यासाठी आमचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. (हेही वाचा, Nashik Fire: नाशिक येथील Currency Note Press परिसरात आग, मुख्य इमारत सुरक्षीत असल्याने धोका टळला)
ट्विट
भालसवा येथील आगीमुळे धुराचे लोटच्या लोट आकाशात उडत आहेत. आग आणि धुराचे प्रमाण इतके आहे की, परिसरातील नागरी भागात आणि हवेत मोठ्या प्रमाणावर प्रदुषण पाहायला मिळत आहे. दिल्लीतील वायू प्रदुषणाची स्थिती आगोदरच खालावलेली आहे. त्यातच आता या आगीने आणखी भर घातली आहे.