दिल्ली येथे जैश संघटनेचा दहशतवादी अटक, पुलवामा हल्ल्याची होती माहिती
दिल्ली पोलिसांनी जैश-ए-मोहम्मद (Jaish-E-Mohammad) या दहशतवादी संघटनेच्या सज्जाद खान (Sajjad Khan) ह्याला अटक केली आहे.
पुलवामा (Pulwama) हल्ल्यानंतर दिल्ली (Delhi) पोलिसांना एका दहशतवाद्याला अटक करण्यात मोठे यश आले आहे. दिल्ली पोलिसांनी जैश-ए-मोहम्मद (Jaish-E-Mohammad) या दहशतवादी संघटनेच्या सज्जाद खान (Sajjad Khan) ह्याला अटक केली आहे. असे सांगितले जात आहे की, पुलवामा हल्ल्यापूर्वी सज्जद ह्याने दिल्लीत पळ काढला होता. परंतु हल्ल्याचा मास्टरमाइंड मुदस्सिर ह्याच्या सोबत संपर्कात होता.
रिपोर्टनुसार, सज्जद हा जम्मू-काश्मिर येथे राहणारा आहे. त्याला पुलवामा मधील सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला होणार असल्याची संपूर्ण माहिती होती. सज्जद सातत्याने मुदस्सिर ह्याच्या संपर्कात होता. परंतु मुदस्सिर हा नुकताच एका गोळीबारात मारला गेला आहे.(हेही वाचा-जम्मू-काश्मिर येथे 24 तासात दहशतवादी लष्कर कमांडर अलीसह 5 जणांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश)
सज्जद ह्याचे 2 भाऊ जैश संघटनेमध्ये होते. त्यांना भारतीय सेनेने एका गोळीबारात कंठस्नान घातले गेले. त्यामुळे आता सज्जाद ह्याच्या अटकेला महत्व दिले जात आहे. तसेच कंपन्यांना अशी माहिती मिळाली होती की, जैश संघटना दिल्ली येथे सुद्धा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. सज्जद ह्याच्या तपासणी दरम्यान असे समोर आले आहे की, सज्जद आणि मुदस्सिर हे दोघे एका अॅपच्या माध्यमातून खोट्या क्रमांक वापरुन एकमेकांच्या संपर्कात होते.
या तपासणीत कंपन्यांना असे ही कळले की, पुलवामा हल्ल्याची तयारी एक महिन्यापासून सुरु करण्यात आली होती. ISI ने जैश-ए-मोहम्मद, तालिबानी आणि हक्कानी नेटवर्क यांच्यासह बैठक घेऊन हल्ला करण्याचे ठरविले गेले होते.