Delhi IAS Coaching Center Tragedy: दिल्लीच्या आयएएस कोचिंग सेंटरच्या मालकासह दोघांना अटक; विना परवानगी तळघरात सुरू होती लायब्ररी!
या ठिकाणी वर्गदेखील घेतले जात होते. महत्त्वाचे म्हणजे या तळघराची परवानगी गोडाऊन म्हणून वापरण्यासाठी देण्यात आली होती.
दिल्लीतील जुने राजेंद्र नगर (Old Rajinder Nagar) येथे झालेल्या कोचिंग दुर्घटनेत कोचिंग सेंटरच्या तळघरात (Basement of the Coaching Centre) पाणी साचल्याने श्रेया यादव, तानिया सोनी आणि नेविन डेल्विन या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आता विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या कोचिंग सेंटरवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. याप्रकरणी दिल्लीच्या महापौर शेली ओबेरॉय यांनी संबंधित कोचिंग सेंटरचे तळघर बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. आता या कोचिंग सेंटरच्या मालकासह अन्य एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तसेच या तळघरात परवानगीशिवाय लायब्ररी स्थापन करण्यात आल्याचे समोर आले आहे. (हेही वाचा - Delhi IAS Coaching Center Tragedy: दिल्ली अभ्यासिकेत पाणी घुसल्याने तिघांचा मृत्यू झाल्यानंतर IAS कोचिंग सेंटरचा मालक आणि समन्वयक ताब्यात)
परवानगी नसतानाही या इमारतीच्या तळघरात लायब्ररी सुरु करण्यात आली होती. या ठिकाणी वर्गदेखील घेतले जात होते. महत्त्वाचे म्हणजे या तळघराची परवानगी गोडाऊन म्हणून वापरण्यासाठी देण्यात आली होती. मात्र, तरीही नियमांचे उल्लंघन करत यासाठिकाणी बेकायदा लायब्ररी सुरु करण्यात आली होती. पोलिसांनी बीएनएस कलम 105, 106(1), 152, 290 आणि 35 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. कोचिंग सेंटरचे व्यवस्थापन आणि नागरी संस्थेच्या लोकांची चौकशी सुरू आहे.
दरम्यान या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून या कोचिंग सेंटरवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. यानंतर दिल्लीच्या महापौर शेली ओबरॉय यांनी संबंधित कोचिंग सेंटरचे तळघर बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच दिल्ली पोलिसांनी आयएएस कोचिंग सेंटरच्या मालकासह दुसऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात केली आहे.