HC On Calling a Woman 'Gandi Aurat': महिलेला 'गंदी औरत' म्हणने विनयभंग नाही- कोर्ट
महिलेला अपेक्षीत असे न वागणे म्हणजेही विनयभंग म्हणता येणार नसल्याचे कोर्टाने म्हटले.
Delhi High Court on Gandi Aurat: एखाद्या व्यक्तीने महिलेला गंदी औरत म्हणने किंवा तिच्याशी उद्धट, असभ्य वागणे भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 509 नुसार स्त्रीच्या विनयभंगाच्या कक्षेत येणार नाही, असा स्पष्ट निकाल दिल्ली हायकोर्टाने दिला आहे. महिलेला अपेक्षीत असे न वागणे म्हणजेही विनयभंग म्हणता येणार नसल्याचे कोर्टाने म्हटले. महिला कर्मचाऱ्यास गंदी औरत असेल संबोधून असभ्य भाषा वापरल्याच्या आरोपाखाली एका पुरुषाविरुद्ध आयपीसी कलम 509 अन्वये गुन्ह दाखल होता. दरम्यान, आपीसी कलम 509 अंतर्गत एका पुरुषाविरुद्ध आरोप निश्चित करणारा ट्रायल कोर्टाचा आदेश बाजूला ठेवत कोर्टाने हे निरीक्षण मांडले. दरम्यान, कोर्टाने सदर पुरुष हा तिचा बॉस होता असेही नमुद केले.
न्यायालयाने महटले की, 509 अन्वये आयपीसी खटल्याचा निकाल देण्यापूर्वी आरोप असलेल्या सदरील व्यक्तीची पार्श्वभूमी विचारात घेणेही महतत्वाचे आहे. एखाद्या परिस्थितीत तक्रारदाराने कोणत्या परिस्थितीत तक्रार दिली. शिवाय त्याच्याबद्दल वापरलेल्या शब्दांचा अर्थ त्याने कसा घेतला याचाही विचार करायला हवा, असे कोर्टाने म्हटले. न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी ही निरीक्षणे नोंदवली.
कोर्टाने पुढे असेही म्हटले की, गंदी औरत हा शब्द संदर्भहीन पद्धतीने वापरला गेला. त्यामध्ये स्त्रीच्या विनयाचा अपमान करण्याचा कोणताही हेतू दिसत नाही. त्यामुळे हे प्रकरण 509 अंतर्गत येत नाही.