दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी नरेंद्र मोदी यांना शिवाजी महाराज तर अमित शाह यांना तान्हाजी रूपात दाखवणारा Video Viral; नेटकरी भडकले!

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Assembly Elections 2020) पार्श्वभूमीवर आणखीन एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अजय देवगण याच्या तान्हाजी: द अनसंग वॉरिअर (Tanhaji: The Unsung Warrior) या चित्रपटातील काही सीन्सना एकत्रित करून तयार केलेला हा मॉर्फिंग व्हिडीओ आहे

Viral Video (Photo Credits: Twitter/ Politcalkida)

आज के शिवाजी नरेंद्र मोदी (Aaj Ke Shivaji- Narendra Modi) या पुस्तकाचा वाद अगदी ताजा असतानाच आता आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Assembly Elections 2020)  पार्श्वभूमीवर आणखीन एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अजय देवगण याच्या तान्हाजी: द अनसंग वॉरिअर (Tanhaji: The Unsung Warrior) या चित्रपटातील काही सीन्सना एकत्रित करून तयार केलेला हा मॉर्फिंग व्हिडीओ आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrapati shivaji Maharaj) चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शाह यांचा चेहरा लावण्यात आला आहे.  हा व्हिडीओ भाजपने (BJP)  ट्विट केलेला नसून सध्या पॉलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरून हा मार्फ व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

आज के शिवाजी नरेंद्र मोदी पुस्तकावरून उदयनराजे भोसले भडकले, ..नाहीतर गोयल ला राजेशाही दाखवली असती म्हणत केले 'हे' ट्वीट

या व्हिडीओ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शाह आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उदयभान राठोड यांच्या रूपात दाखवण्यात आले आहे. नरेंद्र मोदी व अमित शहा हे दिल्लीसाठी कोंढाणा किल्ल्याप्रमाणे युद्ध करायला तयार आहेत, 'शाहीन बाग से उन्होंने वोट बँक की राजनिती शुरू की है, आखरी दांव हम खेलेंगे,’ असे संवादही यामध्ये पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी व्हिडीओ तात्ळाळ डिलीट करावा आणि माफी मागावी, अन्यथा याचे परिणाम वाईट होतील अशा प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

असा आहे हा व्हायरल व्हिडीओ

दरम्यान, याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना "शिवराय हे युगपुरुष आहेत, राजकारणासाठी त्यांचा प्रमाण सहन केला जाणार नाही". असे म्हंटले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now