Delhi Assembly Election Aaj Tak Exit Poll Results 2020: दिल्ली विधानसभा निवडणूक आज तक एक्झिट पोल लाईव्ह स्ट्रिमींग पाहा इथे

त्यामुळे या निर्देशांचे पालन करत या सर्व संस्था मतदान वेळ संपल्यानंतरच एक्झिट पोल्स जाहीर करतात.

(Photo Credits-File Image)

Delhi Vidhan Sabh Election Aaj Tak Exit Poll Results 2020: दिल्ली विधानसभेसाठी एकूण 70 जागांसाठी आज (8 फेब्रुवारी 2020) मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्ष (AAP), भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) मैदानात आहेत. या निवडणुकीत 70 जागांसाठी सुमारे 672 उमेदवार आपल्या जनमताचा कौल आजमावत आहेत. तर दिल्लीतील सुमारे 1,47,86,382 मतदार या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद करत आहेत. या मतदानाची मतमोजणी 11 फेब्रुवारी या दिवशी होणार आहे. दरम्यान, मतदानाची वेळ संपताच आज सायंकाळी दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 एक्झिट पोल्स निकालही सांगितले जाणार आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणूक एक्झिट पोल्स निकाल आज सायंकाळी साधारण 6.30 वाजण्याच्या दरम्यान प्रसिद् होतील. आज तक या वृत्तवाहिनीचा दिल्ली विधानसभा एक्झिट पोल्स (Delhi Elections 2020 Exit polls) निकाल आपण aajtak.intoday.in या संकेतस्थळावर पाहू शकता. (हेही वाचा, Delhi Assembly Election ABP News Exit Poll Results 2020: दिल्ली विधानसभा निवडणूक एबीपी न्यूज एक्झिट पोल लाईव्ह स्ट्रिमींग पाहा इथे)

आज तक एक्झिट पोल लाईव्ह रिजल्ट

दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसारह मतदानाची वेळ संपल्यानंतरच प्रसारमाध्यमं आणि विविध संस्था एक्झिट पोल्स अंदाज जाहीर करु शकतात. त्यामुळे या निर्देशांचे पालन करत या सर्व संस्था मतदान वेळ संपल्यानंतरच एक्झिट पोल्स जाहीर करतात. दिल्लीकर जनता आपला कौल नेमका कोणाला देते याबाबत अेकांच्या मनात मोठी उत्सुकता आहे. ही उत्सुकता प्रत्यक्ष मतदानाचा दिवस म्हणजे 11 फेब्रुवारी पर्यंत कायम राहणार आहे. असे असले तरी मतदान संपल्याबरोबर विविध प्रसारमाध्यम समूह आणि संस्था आपापले एक्झिट पोल्स अंदाज जाहीर करतात. राजकीय विषयांमध्ये विशेष आवड असणाऱ्या मंडळींना हे एक्झिटपोल्सचे अंदाज फार महत्त्वाचे असतात.