Delhi Assembly Election 2020: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची मुदत समाप्त; आता 8 फेब्रुवारीच्या मतदानावर देशाचे लक्ष
त्यासाठी सुरु असलेल्या प्रचाराची वेळ गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता संपली.
8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी (Delhi Assembly Election 2020) मतदान पार पडणार आहे. त्यासाठी सुरु असलेल्या प्रचाराची वेळ गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता संपली. आता कोणताही पक्ष प्रचार करू शकणार नाही. प्रचाराच्या शेवटी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले की, 'मला विश्वास आहे की 8 फेब्रुवारी रोजी लोक जे काम झाले त्यालाच मतदान करतील.' याबाबत अरुविंद केजरीवाल यांनी ट्वीट केले आहे.
ते म्हणतात, 'प्रचाराची वेळ संपली आहे. आम आदमी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि समर्थकाचा मला अभिमान आहे ज्याने मॉडेल निवडणूक अभियान राबवून लोकांची मने जिंकली. जे सत्याच्या मार्गावर कार्य करतात त्यांना देव नेहमीच साथ देतो. मला खात्री आहे की 8 फेब्रुवारी रोजी लोक कामाला मतदान करतील.'
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. दिल्लीतील सर्व 70 जागांवर एकाच वेळी मतदान होणार आहे. याशिवाय 11 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. सन 2015 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत, आम आदमी पक्षाने 67 जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळविला होता. त्यावेळी भाजपला तीन जागा मिळाल्या आणि कॉंग्रेसला शून्य जागा मिळाल्या होत्या.
कॉंग्रेसचे केंद्रीय नेतृत्व दिल्लीतील लोकांमध्ये प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचले. याखेरीज दिल्लीचे नेतेही प्रचारापासून बरेच लांब राहिलेले दिसले. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर प्रचारापर्यंत कॉंग्रेसची स्थिती तशीच राहिली. निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस तिसर्या क्रमांकावर राहिले. त्यासाठी कॉंग्रेसकडे 40 हून अधिक स्टार प्रचारक होते. परंतु प्रचारामध्ये विधानसभा मतदार संघात मोजकेच नेते दिसले. (हेही वाचा: दिल्ली विधानसभा निवडणूकीत 80 वर्षावरील मतदारांसाठी खास सोय, 'पोस्टल बॅलेट' च्या माध्यमातून बजावू शकता मतदानाचा हक्क)
दिल्लीत प्रचारासाठी भाजपाने आपल्या 200 खासदारांना 70 विधानसभा जागांवर उभे केले असून, भाजपाने आपल्या 200 खासदारांवर प्रचाराची जबाबदारी सोपविली होती. अमित शाह पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत सभा घेतल्या. आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ते 8 फेब्रुवारीच्या मतदानावर आणि त्यानंतर येणाऱ्या निकालावर.