Delhi's Air Quality: दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावली, AQI पातळी धोकादायक स्थितीत; हिवाळ्यात हवेतील प्रदूषण पातळी गंभीर होण्याची शक्यता

पुढचे काही काळ ही स्थिती अशीच कायम राहण्याची शक्यता आहे. खास करुन हिवाळ्यात, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Delhi Air Pollution | (Photo Credits: X)

राष्ट्रीय राजधानी दिल्ली शहरातील हवेची गुणवत्ता बुधवारी (27 नोव्हेंबर) 'अत्यंत खराब' श्रेणीत कायम राहिली. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्याची स्थिर स्थिती आणि दिशा पाहता ही स्थिती पुढील 24 तासात आणखी 'गंभीर पातळी' गाठू शकते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CBCB) मंगळवारी (26 नोव्हेंबर) संध्याकाळी 4 वाजता हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 343 नोंदवला, जो सोमवारी 349 च्या तुलनेत किंचित सुधारला. मात्र, बुधवारपर्यंत एक्यूआय 302 नोंदला गेला, ज्यामुळे किमान दिलासा मिळाला. हवेचा वेग कमी झाल्यामुळे हवेच्या गुणवत्तेत आणखी घट होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे, ज्यामुळे प्रदूषणाची पातळी आणखी खालावण्याची शक्यता आहे.

हवामान तज्ज्ञांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, स्थिर वाऱ्याची स्थिती प्रदूषकांना जमिनीजवळ अडकवून टाकते, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्यावर त्यांचा परिणाम तीव्र होतो", त्यांनी त्वरित पर्यावरणीय कारवाईचे आवाहन केले.

सर्वाधिक प्रदुषण असलेली ठिकाणे

दिल्ली वायू प्रदूषण इतके गंभीर आहे की, अनेक भागात मंगळवारी सकाळी एक्यूआयची पातळी चिंताजनक उच्च पातळीवर नोंदवली गेली, 39 पैकी 18 हवेची गुणवत्ता देखरेख केंद्रांमध्ये "गंभीर" स्थिती नोंदवली गेली. आनंद विहार, मुंडका, रोहिणी आणि विवेक विहार हे सर्वाधिक प्रभावित क्षेत्र असून एक्यूआय 420 ते 443 च्या दरम्यान आहे. (हेही वाचा, World's Best Cities 2025: जगातील सर्वोत्तम शहरांमध्ये लंडन अव्वल; टॉप 100 मध्ये कोणत्याही भारतीय शहराचा समावेश नाही)

प्रदूषणाची मूळ कारणे

केंद्राच्या डिसिजन सपोर्ट सिस्टमने (DSS) दिल्लीच्या प्रदूषणात वाहनांच्या उत्सर्जनाचे सर्वात मोठे योगदान असल्याचे म्हटले आहे. ज्यामध्ये खालील घटकांचा समावेश आहे:

भारतात वायुप्रदूषण चिंताजनक

भारतातील हवेच्या गुणवत्तेचे संकट दिल्लीच्या पलीकडेही पसरले आहे. 2023 च्या आयक्यूएअर वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टने दिल्लीला केवळ बेगुसराय आणि गुवाहाटीनंतर जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर म्हणून गणले आहे. याउलट, झुरिच, हेलसिंकी आणि कोपनहेगन यासारख्या शहरांनी सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले, ज्यामुळे मजबूत पर्यावरणीय धोरणांचा प्रभाव दिसून येतो.

शहरातील अनेक ठिकाणी हवा प्रदुशीत

सामूहिक कारवाईची मागणी

पाठिमागील अनेक महिन्यांपासून दिल्ली ही विषारी हवा घेत आहे. ज्यामुळे सामाजिक चिंता वाढली आहे. परिणामी नागरिकांकडून सक्रिय उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी करत आहेत. तज्ज्ञांनीही वायूप्रदूषण कमी करण्यासाठी सामुहीक उपाययोजनेची आवश्यक्ता व्यक्त केली आहे. त्यासाठी त्यांनी खालील उपाय सूचवले आहेत.

शहरात दाट धुक्याचा थर

दिल्लीतील AQI 300 च्या वर असलेली ठिकाणे

अलिपूर, अशोक विहार, बवाना, ITO आणि जहांगीरपूरसह दिल्लीतील 18 ठिकाणी AQI 300 च्या वर मोजण्यात आले. त्याच वेळी, इतर भागात AQI 300 च्या खाली नोंदवला गेला.

आनंद विहार: 316- अतिशय खराब

अशोक विहार: 316- अतिशय खराब

बावना: 343- अतिशय खराब

जहांगीरपुरी: 330-अतिशय खराब

मुंडका: 352- अतिशय खराब

नरेला: 281- अतिशय खराब

पंजाबी बाग: 327- अतिशय खराब

वजीरपूर: 331- अतिशय गरीब

आनंद विहार: 262- अतिशय खराब

दिल्ली छावनी: 328- अतिशय खराब

केवळ दिल्लीच नव्हे तर भारतातील इतरही काही शहरांमध्ये वायूप्रदूषण चिंतेचा विषय ठरत आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरातही हवेची गुणवत्ता घसरल्याची अनेक उदाहरणे घडली आहेत. त्यामुळे हळूहळू वायूप्रदूषण हा देशभर चिंतेच विषय ठरत आहे.