Delhi Pollution, AQI Drops: दिल्लीमध्ये वायुप्रदूषण कायम, AQI 'अत्यंत खराब' स्थितीत; संकटाचा सामना करण्यासाठी सरकारकडून कठोर उपाययोजना

धुके अद्यापही कायम आहे. प्रदूषणाचा सामना करण्यासाठी अधिकारी फटाके फोडण्यावर बंदी आणि पाण्याच्या फवारणी यंत्रांचा वापर यासह उपाययोजना वाढवतात.

Delhi Pollution | (Photo Credit: X/ANI)

भारतातील काही प्रमुख शहरांमधील हवेची गुणवत्ता (Delhi Air Quality Index) प्रचंड खालावली आहे. खास करुन राजधानी दिल्ली विशेष प्रदुशीत (Delhi Pollution) झाली आहे. पाठिमागील काही दिवसांपासून या शहरातील हवेची गुणवत्ता 'अत्यंत खराब' स्थितीत पोहोचली आहे. प्राप्त माहितीनुसार, दिल्लीच्या वायू गुणवत्ता निर्देशांकात (AQI) गुरुवारी 'अत्यंत खराब' श्रेणीत किंचित सुधारणा झाली. तथापि, राष्ट्रीय राजधानीला अद्यापही धुक्याने (Smog in Delhi) वेढलेलेच आहे. ज्यामुळे शहरातील दृश्यमानता कमी झाली असून, चिंता अद्यापही कायम आहे. आव्हानांचा सामना करण्यासाठी शासन-प्रशासन प्रयत्नशील आहे. तसेच, कठोर निर्बंधांनाही प्राधान्य दिले जात आहे.

दिल्ली शहरातील सध्याची एक्यूआय स्थिती

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (22 नोव्हेंबर) सकाळी दिल्लीचा एक्यूआय 369 होता, ज्यामध्ये किंचित सुधारणा झाली. असे असूनही, अनेक क्षेत्रे 'गंभीर' श्रेणीत राहिली आहेतः दिल्ली शहरातील प्रदुषण अधिक असलेली ठिकाणे खालील प्रमाणे:

(हेही वाचा, Delhi Air Pollution: दिल्लीतील वायू प्रदूषण गंभीर श्रेणीत; GRAP-IV निर्बंध लागू, शाळांना सुट्टी, वर्ग ऑनलाईन सुरु)

इतर भागात एक्यूआयची पातळी खालीलप्रमाणे नोंदवली गेलीः

दरम्यान, शहरातील वायुप्रदूषणासोबतच यमुना नदीलाही प्रदुषणाचा फटका बसला आहे. नदीपात्रात विषारी फेस पाहायला मिळत आहे. (हेही वाचा, Weather Forecast Today: मुंबईमध्ये दाट धुके, तापमान 28 ते 31अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता)

लोधी रोड परिसरात धुकेच धुके

सरकारी पातळीवर अनेक उपाययोजना

दिल्ली सरकारने प्रदूषणाच्या संकटाचा सामना करण्यासाठी प्रयत्न तीव्र केले आहेत. त्यासाठी विविध उपायययोजना सुरु आहेत. या उपाययोजना खालीलप्रमाणे:

पाण्याचे फवारणी यंत्रः धुळीची पातळी कमी करण्यासाठी संपूर्ण शहरात ट्रकवर बसवलेले फवारणी यंत्र तैनात केले जात आहेत.

फटाके बंदीः दिल्ली पोलिसांनी राष्ट्रीय राजधानी (NCT) प्रदेशात ऑनलाइन विक्री आणि फटाके वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत.

कडक नियमः वायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने (CAQM) प्रदूषण नियंत्रण उपायांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती आराखड्यात (GRAP) सुधारणा केली आहे.

आम आदमी पक्षाची केंद्रावर टीका

वाढत्या प्रदूषण संकटाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाने (आप) केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्यावर टीका केली आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये 'आप' ने म्हटले आहे की, 'भूपेंद्र यादव जी को कोई फर्क नहीं पढ़ता' (Bhupendra Yadav does not care). दरम्यान, राजकीय पक्ष आरोपप्रत्यारोपाच्या दलदलीत अडकले असले तरी नागरिक मात्र संतापले आहेत. दाट धुके नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत असल्याने, नागरिक अधिकाऱ्यांना अधिक कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन करत आहेत.