Dehradun: लग्नाच्या वऱ्हाडाची बस घाटात उलटली, 25 जागीच ठार; उत्तराखंडमधील पौरी गढवाल येथील घटना

घाटात बस उलटून झालेल्या या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या अजूनही वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

Uttarakhand Bus Accidents | (Photo Credit - Twitter)

उत्तराखंडमधील (Uttarakhand) पौरी गढवाल (Pauri Garhwal) येथे लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसला भीषण अपघात (Uttarakhand Bus Accidents) झाला. घाटात बस उलटून झालेल्या या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या अजूनही वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. बसमध्ये एकूण 40 पेक्षा अधिक प्रवासी होते.सिमडी गावाजवळ ही घटना काल (मंगळवार, 4 सप्टेंबर) रात्री घडली. राज्य आपत्ती निवारण दल आणि पोलिसांनी एकूण 21 प्रवाशांची घटनास्थळावरुन सुटका केली आहे.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, धुमाकोटच्या बिरोखल भागात काल रात्री झालेल्या पौरी गढवाल येथील बस अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस आणि SDRF ने रात्रभर बचावमोहीम राबवून 21 जणांची सुटका केली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे पोलीस प्रमुख अशोक कुमार यांनी दिली आहे. राज्याच्या पोलीस प्रमुखांनी रात्रभर चाललेल्या या मोहिमेची काही दृश्ये ट्विट केली आहेत, ज्यामध्ये बचाव पथक जखमी प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी नेताना दिसत आहे. (हेही वाचा, Uttarakhand Avalanche: उत्तराखंडमध्ये हिमस्खलन, 10 गिर्यारोहकांचा मृत्यू, शोधमोहीम अद्यापही सुरुच)

ट्विट

पंतप्रधान कार्यालयानेही या अपघाताची नोंद घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाने या अपघाताला "हृदय पिळवटून टाकणारी घटना" म्हणून संबोधले आहे. पीएमओ कार्यायलाने ट्विटमध्ये म्हटले आहेकी, " उत्तराखंडमधील पैढी येथे झालेला बस अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या दु:खद प्रसंगी आमच्या भावना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. मला आशा आहे की जे जखमी झाले आहेत ते लवकरात लवकर बरे होतील. बचावकार्य सुरू आहे. त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे ट्विट पंतप्रधान कार्यालयाने केले आहे.

ट्विट

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेतील मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि राज्य सरकार त्यांच्या कुटुंबियांसोबत उभे असल्याचे सांगितले. तत्पूर्वी, हरिद्वारचे पोलिस प्रमुख स्वतंत्र कुमार सिंह यांनी सांगितले होते की, लग्नाचे वऱ्हाड जिल्ह्यातील लालधंग येथून निघाले होती आणि नंतर त्यांना बसला अपघात झाल्याची माहिती मिळाली.