Acid attack Case Delhi: दिल्ली ॲसिड हल्ला प्रकरणी महिला आयोगासोबतच दिल्ली पोलिसांकडूनही Flipkart ला नोटीस

दिल्ली ॲसिड हल्ला (Acid attack Case Delhi) प्रकरणात सचिन नामक एक युवक प्रमुख आरोपी आहे. आरोपीने फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपनीकडून ॲसिड ऑनलाईन प्रणालीद्वारे मागवले होते.

Delhi Acid Attack Case (PC- Twitter)

दिल्लीत 17 वर्षीय मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ला प्रकरणी दिल्ली पोलिसांनी फ्लिपकार्ट (Delhi Police Issue a Notice to Flipkart) कंपनीला नोटीस पाटवली आहे. दिल्ली ॲसिड हल्ला (Acid attack Case Delhi) प्रकरणात सचिन नामक एक युवक प्रमुख आरोपी आहे. आरोपीने फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपनीकडून ॲसिड ऑनलाईन प्रणालीद्वारे मागवले होते. या प्रकरणात दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) प्रमुख स्वाती मालीवाल यांनी गुरुवारी ई-कॉमर्स साइट्स Amazon आणि Flipkart यांना त्यांच्या साइट्सवर अॅसिडच्या विक्रीबद्दल नोटीस बजावली आहे. दिल्ली महिला आयोगासोबतच आता दिल्ली पोलिसांनीही (Delhi Police) या कंपन्यांना नोटीस बजावल्याचे वृत्तसंस्था एएनआयने दिले आहे.

पश्चिम दिल्लीत बुधवारी एका 17 वर्षीय मुलीवर दोन दुचाकीस्वारांनी अॅसिड हल्ला केला. पीडिता तिच्या पश्चिम दिल्लीतील शाळेत इयत्ता 12वीत शिकत होती. शाळा सुटल्यावर अवघ्या काही मिनिटांतच मोटरसायकलवरून आलेल्या दोन मुखवटा घातलेल्या तरुणांनी तिच्यावर ॲसिड फेकले. या हल्ल्यात पीडितेला गंभीर दुखापत झाली. (हेही वाचा, Delhi Acid Attack: दिल्लीत शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीवर तरुणाने फेकले अॅसिड; मुलीची प्रकृती चिंताजनक, Watch Video)

दिल्ली पोलिस फ्लिपकार्टला त्याच्या प्लॅटफॉर्मवर अॅसिड विक्रीबद्दल नोटीस पाठवून फ्लिपकार्टने अॅसिड विक्री करण्यापूर्वी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले आहे की नाही. अशा प्रकारे पदार्थांची, वस्तूंची विक्री करताना आरोपीचे अधिकृत ओळखपत्र तपासण्यात आले की नाही या प्रश्नांची पोलीस उत्तरे मिळविण्याची शक्यता आहे.

ट्विट

पीडितेवर झालेल्या ॲसिड हल्ल्याच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी मुख्य आरोपींसह तिघांना तातडीने अटक केली. मुख्य आरोपी सचिन अरोरा हा किशोरवयीन मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. तीन महिन्यांपूर्वी त्यांच्यात ब्रेकअप झाला होता. दरम्यान, ब्रेकअप झाल्यानंतर त्याने मुलीवर हल्ला केला, असे पोलिसांनी सांगितले. त्यांनी फ्लिपकार्टवरून अॅसिड ऑनलाइन मागवले, असेही पोलीस म्हणाले.

दरम्यान, स्वाती मालीवाल यांनी नोटीसमध्ये साइट्सना त्यांच्या शॉपिंग प्लॅटफॉर्मवर अॅसिड का उपलब्ध आहे? साईट्सवर त्यांचे उत्पादन पोस्ट करण्यापूर्वी संबंधीत विक्रेत्याचा परवाना तपासला गेला का, अशी विचारणा केली. मालिवाल यांनी साइट्सना त्यांच्या साइटवर अॅसिड विकण्यासाठी प्लॅटफॉर्मद्वारे मिळवलेल्या परवान्याची प्रत देण्यास सांगितले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif