Sputnik V कोविड-19 लस उत्पादन करण्यास Serum Institute ला DCGI कडून परवानगी

लस उत्पादनासाठी सीरम इंस्टीट्यूटने रशियाच्या गमलेया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडिमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी सोबत करार केला आहे.

Sputnik V | Image used for Representational purpose only | File Image

रशियाच्या (Russia) स्पुटनिक व्ही (Sputnik V) लसीची उत्पादन करण्यास सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाला (Serum Institute of India) DCGI कडून परवानगी मिळाली आहे. एखाद्या परिस्थितीत लसीचे परिक्षण, चाचणी आणि विश्लेषण यासाठी स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादन सीरम इंस्टीट्यूट भारतात करणार आहे. स्पुटनिक व्ही लस उत्पादनासाठी सीरम इंस्टीट्यूटने रशियाच्या गमलेया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडिमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी (Gamaleya Research Institute of Epidemiology and Microbiology) सोबत करार केला असून हडपसर (Hadapsar) येथील फॅसिलिटीमध्ये याचे उत्पादन करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Sputnik V कोविड लसीच्या निर्मितीसाठी SII ने DCGI कडे टेस्ट लायसंस करिता परवानगीचा अर्ज केला होता. त्यानंतर आता हडपसर येथील फॅसिलिटीमध्ये काही अटी आणि शर्थींच्या आधारे  तपासणी, चाचणी आणि विश्लेषणासाठी सीरम इंस्टीट्यूटला DCGI ने  स्पुटनिक व्ही लस उत्पादनासाठी परवानगी मिळाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र सिरम इंस्टीट्यूटला  गमलेया रिसर्च इन्स्टिट्यूटसोबत झालेल्या कराराची एक प्रत DCGI कडे सुपूर्त करणे गरजेचे आहे. यासोबतच टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करार प्रत देखील देणे आवश्यक आहे. (Covid-19 Vaccine Update: देशात Sputnik V लसीचे उत्पादन ऑगस्ट महिन्यापासून सुरु)

त्यानंतर सेलबँक आणि व्हायरस स्टॉक आयात करण्यासाठीचे परवानगी पत्र सीरमने DCGI ला दाखवणे गरेजेचे आहे. लस उत्पादनाची परवानगी मिळाल्यानंतर या लसीच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंटचा आढावा घेण्यासाठी RCGM चे मंजुरी पत्र दाखवणे गरजेचे असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सीरम  इंस्टीट्यूटने केलेल्या अर्जामधील काही बाबींवर RCGM ला शंका निर्माण झाली आहे. यासोबतच गमलेया रिसर्च इन्स्टिट्यूट आणि सिरम इंस्टीट्यूटमध्ये मेटेरियल ट्रान्सफरचा करार दाखवणेही गरजेचे आहे. दरम्यान, सध्या स्पुटनिक व्ही चे हैद्राबाद स्थित डॉ. रेड्डीज लॅबमध्ये उत्पादन सुरु आहे.