Dawood Ibrahim Remarried: दाऊद इब्राहिम याचे पाकिस्तानी पठाण महिलेशी दुसरे लग्न, अलीशाह पारकर याची NIA कडे दावा

हसिना पारकर (Haseena Parkar) हिचा मुलगा आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम (Dawood Ibrahim) याचा भाचा अलीशाह पारकर (Alishah Parkar याने राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थातच एनआयएकडे धक्कादायक खुलासा केला आहे.

Dawood Ibrahim (Photo Credits: ANI)

हसिना पारकर (Haseena Parkar) हिचा मुलगा आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम (Dawood Ibrahim) याचा भाचा अलीशाह पारकर (Alishah Parkar याने राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थातच एनआयएकडे धक्कादायक खुलासा केला आहे. अलीशाह पारकर याने दिलेल्या माहितीनुसार, पहिली पत्नी मैजाबीन (Maizabin हिच्याशी विवाहबद्ध झाला असताना दाऊदने पाकिस्तानातील पठाण महिलेशी (Pakistani Pathan Woman) पुनर्विवाह केला आहे.

अलीशाह पारकर याने दाऊदच्या एकूण कामकाज पद्धत आणि एकप्रकारे वंशावळच तपास यंत्रणांना सांगितली आहे. त्याने सांगितले की, दाऊदची पहिली पत्नी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे लोकांशी संपर्क साधते. टेरर फंडिंग प्रकरणात एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात अलीशाने दाऊदच्या कुटुंबाचा तपशील सांगितला आहे. त्याच्या विधानात ज्यात त्याने दावा केला की दाऊदने स्वत: ला पाकिस्तानातील कराचीमध्ये दुसऱ्या ठिकाणी हलवले आहे. (हेही वाचा, एनआयएने जाहीर केले Dawood Ibrahim वर 25 लाख, तर त्याचा साथीदार Chhota Shakeel वर 20 लाखांचे रोख बक्षीस)

एनआयएने टेरर फंडिंग प्रकरणात दाऊद इब्राहिम आणि त्याच्या जवळच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता आणि काही लोकांना अटकही केली होती. एनआयएला माहिती मिळाली होती की दाऊद इब्राहिम एक विशेष टीम तयार करत आहे, जी देशातील बड्या नेत्यांवर आणि उद्योगपतींवर हल्ला करू शकते. ते मोठ्या शहरांमध्ये हिंसाचार पसरवू शकतात. या प्रकरणाच्या तपासादरम्यान एनआयएने दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिचा मुलगा अलीशाह पारकर हिचाही जबाब नोंदवला.

अलीशाहने एनआयएला दिलेल्या माहितीनुसार, दाऊदला चार भाऊ (स्वत:सह 5) आणि चार बहिणी आहेत. दाऊद इब्राहिमने दुसरं लग्न केलं आहे. त्याची दुसरी पत्नी पाकिस्तानी पठाण आहे. अलीशाह इब्राहिम पारकरच्या सांगण्यानुसार, दाऊद इब्राहिम सर्वांना सांगत आहे की त्याने आपली पहिली पत्नी मैजाबीन हिला घटस्फोट देऊन दुसरे लग्न केले आहे. त्याने तसे केले नाही. याशिवाय दाऊद इब्राहिमचा पत्ताही बदलला आहे. आता तो कराचीतील अब्दुल्ला गाझी बाबा दर्ग्याच्या मागे असलेल्या रहीम फकीजवळील कडेकोट सुरक्षेत राहतो.

अलीशाहने पुढे म्हटले आहे, काही महिन्यांपूर्वी तो दाऊद इब्राहिमची पत्नी मैजाबीन हिला जुलै 2022 मध्ये दुबईत भेटला होता. दुबईत तो जैतून हमीद अंतुले यांच्या घरी राहिल्याचा दावा त्यांनी केला. दाऊदची पत्नी मैजाबीन माझ्या पत्नीला सणासुदीलाही फोन करते, माझ्या पत्नीशी व्हॉट्सअॅप कॉल्सद्वारे बोलते, असे त्याच्या वक्तव्यात म्हटले आहे.

सध्या दाऊद इब्राहिम कासकर, हाजी अनीस उर्फ अनीस इब्राहिम शेख आणि मुमताज रहीम फकी हे त्यांच्या कुटुंबीयांसह अब्दुल्ला गाझी बाबा दर्ग्याच्या मागे डिफेन्स कॉलनी, पाकिस्तान, कराची येथे राहतात. अलीशाह पारकरच्या म्हणण्यानुसार दाऊद इब्राहिम कोणाशीही संपर्क ठेवत नाही.

अलीशाहने एनआयएला दिलेल्या माहितीनुसार, दाऊद इब्राहिम कासकरच्या पत्नीचे नाव मैजाबीन असून तिला तीन मुली आहेत. एकाचे नाव मारुख (जावेद मियांदादचा मुलगा जुनैदशी विवाहित), दुसऱ्याचे नाव मेहरीन, तर तिसऱ्याचे नाव माझिया (अविवाहित) आणि मुलाचे नाव मोहिन नवाज आहे. दाऊद इब्राहिमची दुसरी पत्नी पाकिस्तानी पठाण आहे.