Cyclone Yaas: यास चक्रीवादळामुळे बंगाल समुद्र किनारपट्टीवर उंचच उंच लाटा; ओडिशा राज्यातील भद्रक जिल्ह्यातील रिहायशी परिसरात शिरले पाणी
या वादळाने ओडिशा (Odisha) आणि पश्चिम बंगाल (West Bengal) राज्यातील किनारपट्टीलगतच्या प्रदेशात प्रवेश केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या वृत्तानुसार या चक्रीवादळ आता वेगाने पुढे सरकत आहे.
यास चक्रीवादळ (Cyclone Yaas) आता आपले रौद्र रुप दाखवू लागले आहे. या वादळाने ओडिशा (Odisha) आणि पश्चिम बंगाल (West Bengal) राज्यातील किनारपट्टीलगतच्या प्रदेशात प्रवेश केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या वृत्तानुसार या चक्रीवादळ आता वेगाने पुढे सरकत आहे. हे चक्रीवादळ सकाली नऊ वाजता ओडिशा राज्यातील भद्रक जिल्ह्यातील भ्रमक येथे पोहोचले होते. या ठिकाणी उंच लाटा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु होता. दुसऱ्या बाजूला पश्चिम बंगाल राज्यालाही इतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाचे महानिदेश मृत्यूंज महापात्र यांनी वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ बालेश्वर च्या दक्षिण देशेला ओडिशाच्या किनारपट्टीवरुन पुढे सरकत आहे. वादळी वारे सध्या प्रतितास 130 ते 140 किलोमीटर प्रती तास वेगाने वाहू लागले आहे. काही काळ वाऱ्याचा वेग कायम राहिली. त्यानंतर साधारण 3 तासांनी वाऱ्याचा वेग हळूहळू कमी होत मंद होत जाईल.
हवामान विभागाने सकाळी माहिती देताना म्हटले की, उद्या सकाळपर्यंत हे वादळ झारखंडपर्यंत पोहोचेल. त्या वेळी वाऱ्याचा वेग कमी होऊन तो साधारण प्रतितास 60 ते 70 कोलोमीटर इतका राहिली. अधिक नुसकानकारख वारे हे वा बालेश्वर, भद्रक आणि पश्चिम बंगालच्या मिदिनीपूर येथे वाहात आहे. ओडिशामध्येही काही जिल्ह्यात वारे प्रतितास 60 ते 70 इतक्या वेगाने वाहात आहे. अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर आणि दक्षिण 24 परगना येथे तटीय परिसरात चक्रीवादळामुळे पाणी शिरले आहे. नद्यांच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे. (हेही वाचा, Cyclone Yaas Updates: 'यास' चक्रीवादळ काही तासातच किनारपट्टीवर धडकणार; पश्चिम बंगाल- ओडिशात वेगवान वारा, पाऊस सुरु)
आयएमडी ट्विट
एएनआय ट्विट
एएनआय ट्विट
‘डॉपलर' रडार (Doppler Weather Radars) डेटानुसार सद्यास्थितीत प्रतितास 130-140 किलोमीटर वेगाने वारे वाहात आहे. ओडिशातील विशेष आयुक्त पी के जैन यांनी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, चक्रीवादळ पोहोचण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ही प्रक्रीया पूर्ण होण्यास कमीत कमी तीन ते चार तासाचा कालावधी लागू शकतो. बालासोर आणि भद्रक जिल्ह्यात या वादळाचा सर्वाधिक फटका बसू शकतो. ओडिशाच्या केभद्रक जिल्ह्यातील धामरा येथे वारे मोठ्या प्रमाणावर वाहात आहे. मुसळधार पावसामुळे समुद्रात पाणी मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे काही ठिकाणी नागरी वस्तीतही पाणी घुसले आहे.