Cyclone Tauktae: तौकक्ते चक्रीवादळामुळे हाहाकार, कर्नाटकात 4 जणांचा मृत्यू झाल्यानंतर अमित शहा यांनी बोलावली बैठक

Cyclone Tauktae (Photo Credits-ANI)

Cyclone Tauktae:  अरबी समुद्रातून उठललेल्या तौकक्ते चक्रवादळामुळे बहुतांश राज्यांनी अलर्ट जाहीर केला आहे. एका बाजूला कर्नाटकात या चक्रीवादळामुळे तुफान पाऊस पडत असून 4 जणांचा बळी सुद्धा गेला आहे. राज्यात एकून 73 गावांना तौकक्ते चक्रीवादळाचा फटका बसला आहे. तसेच तौकक्ते चक्रीवादळ गोवाच्या किनापट्टीवर धडकले आहे. याचा परिणाम पणजी येथे दिसून आला. गोव्यात चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्त्यारस्तांवर झाडं उन्मळून पडली आहेत. मोठी झाडे पडल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या गाड्यांचे ही नुकसान झाले आहे. गोव्याच्या तटावर वेगाने वारे वाहण्यासह मुसळधार पाऊस सुद्धा पडत आहे.

चक्रीवादळाच्या पार्श्वभुमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी आढावा बैठक बोलावली आहे. ज्यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, दमण-दीव आणि दादरा नगर हवेली राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांचे अधिकारी सहभागी होणार आहेत.(Cyclone Tauktae: तौक्ते चक्रीवादळाचे रौद्र रुप; महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांना अधिक तडाख्याची शक्यता)

Tweet:

रविवारी हे चक्रीवादळ मुंबईच्या येथून जाणार असल्याची सुद्धा शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुलेच महापालिकेने शेकडो कोविड रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. तर गुजरात मध्ये सुद्धा हायअलर्ट जाहीर करण्यात आले आहे. सुरत जिल्ह्यात 40 गाव आणि ओलपाड जिल्ह्यातील 28 गावांना ही अलर्ट करण्यात आले आहे. चक्रीवादळामुळे जाहीर करण्यात आलेल्या अलर्टमुळे भावनागर दरम्यान चालणारी रो-रो फेरी सुद्धा 17-18 मे दिवशी बंद राहणार आहे. सौराष्ट्रच्या पोरबंदराच्या येथील 30 गावात अलर्ट जाहीर केला आहे.

हवामान खात्यानुसार असे मानले जात आहे की, तौकक्ते चक्रीवादळ गुजरात मधील वेरावल आणि पोरबंदर दरम्यान मांगलोरच्या जवळील असलेल्या किनारपट्टीवर धडकणार आहे. महाराष्ट्र, केरळ आणि गुजरातच्या तटांवर तीन दिवस चक्रीवादळाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. तर चक्रीवादळामुळे 150 ते 160 किमी प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात.(Cyclone Tauktae: 17 मे रोजी 'तौकते' चक्रीवादळ रौद्र रुप धारण करणार; महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात होणार मुसळधार पाऊस)

Tweet:

IMD कडून 17 मे रोजी मुंबईसह उत्तर कोकणातील काही ठिकाणी वेगाने वारे वाहण्यासह तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा धोका पाहता पीएम मोदी यांनी शनिवारी उच्च स्तरीय बैठक आणि तयारीचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्देशन दिले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif