Cryptocurrency News: आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास क्रिप्टोकरन्सी व्यवहारांबाब काय म्हणाले पाहा

गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे गुंतविण्यासाठी खाते उघडताना अनेक अश्वासने दिली आहेत.

Cryptocurrency | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी क्रिप्टोकरेंसी (Cryptocurrency) बाबत गंभीर विचार करण्याचे अवाहन केले आहे. आरबीआयने आयोजित केलेल्या एका आर्थिक परिषदेत बोलताना शक्तिकांत दास यांनी म्हटले की, आर्थिक व्यवस्था आणि आर्थिक स्थिरता डोळ्यासमोर ठेवता क्रिप्टोकरन्सी हा मुद्दा अधिक गंभीर आणि विचार करण्यासारका आहे. यात अनेक गंभर गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे यावर खोल विचार होणे आवश्यक आहे. क्रिप्टोकरन्सी हे एक अभासी चलन Virtual Currency) आहे.

आरबीआय गव्हर्नर यांनी क्रिप्टोकरन्सीमध्यो होत असलेल्या सध्यास्थितीतील ट्रेडिंगबाबत संशय आणि चिंताही व्यक्त केली आहे. गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे गुंतविण्यासाठी खाते उघडताना अनेक अश्वासने दिली आहेत. त्यांनी असेही म्हटले की, ते आरबीआय बँकेच्या रणनितीवर बारीक नजर ठेऊन आहेत. न्यामक संस्था बँकांच्या व्यवसायिक निर्णयांमद्ये हस्तक्षेप करत नाहीत. (हेही वाचा, Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सी Bitcoin, Ethereum खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी घ्या जाणून)

दरम्यान, आर्थिक घडामोडींवर विचार व्यक्त करत गव्हर्नर यांनी म्हटले की, आर्थिक स्थितीत येत्या काळात सुधारणा दिसत आहेत. त्यांनी म्हटले की, सणांच्या काळात ग्राहकांची मागणी वाढली आहे. ज्यामुळे आर्थिक सुधारणा होत आहे. त्यांनी असेही म्हटले की, या स्थितीचा फायदा घेत ग्राहक आणि उद्योजकांनी आपली क्षमता वाढवायला हवी. शक्तिकांत दास यांनी असेही म्हटले की, जून 2021 च्या तुलनेत सप्टेंबर 2021 मध्ये सकल घाटा संपत्तीत घट झाली. त्यांचे म्हणने असे की, या काळात औद्योगिक कंपन्यांनी आपल्या पूंजीवर अधिक भर दिला पाहिजे.