Cryptocurrency Bitcoin: क्रप्टोकरन्सी बिटकॉईन भाव वधारलेलाच, जाणून घ्या Latest Price
भलेही जगभरातील अनेक देशांनी क्रिप्टोकरन्सीला अधिकृत मान्यता दिली नाही तरीही. क्रिप्टो एक्सचेंज वजीरएक्स (WazirX) नुसार दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आज क्रिप्टोकरन्सी 3.53% वाढीसह 57565 डॉलर म्हणजेच 44,87,301 रुपयांवर ट्रेंड करत होती.
क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन (Bitcoin) दिवसेंदिवस आपली व्याप्ती वाढवतानाच दिसत आहे. भलेही जगभरातील अनेक देशांनी क्रिप्टोकरन्सीला अधिकृत मान्यता दिली नाही तरीही. क्रिप्टो एक्सचेंज वजीरएक्स (WazirX) नुसार दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आज क्रिप्टोकरन्सी 3.53% वाढीसह 57565 डॉलर म्हणजेच 44,87,301 रुपयांवर ट्रेंड करत होती. या वर्षी क्रिप्टोकरन्सीमध्ये 100% तेजी पाहायला मिळत आहे. एप्रिल महिन्यात याची किंमत 65,000 डॉलरच्या आसपास पोहोचली होती. प्राप्त माहितीनुसार, याची किंमत लवकरच 60 हजार डॉलरवर पोहचू शकते.
क्रिप्टोकरन्सीचे विविध प्रकार आहेत. जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी ईथर (Ethereum) ची किंमत गुरुवारी वधारताना पाहायला मिळत आहे. ही करन्सी 3.46% तेजीसोबत 3614.31 डॉलर म्हणजेच 2,81,627 रुपयांवर ट्रेड करत होती. सर्वात अधिक तेजी Polkadot मध्ये पाहायला मिळाली. ही क्रिप्टोकरन्सी 18% तेजीसह ट्रेड करत आहे. याशिवाय Cardano, Dogecoin, XRP, Uniswap, Stellar आणि Binance Coin सुद्धा वेगाने वधारत आहे. (हेही वाचा, Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सी, बिटकॉईन ब्लॉकचेन आदी गुंतवणूक किती सुरक्षीत? खरोखरच सुरक्षीत असतो आपला पैसा?)
बिटकॉइन म्हणजे काय?
बिटकॉइन ही एक प्रकारची क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) आहे. इंग्रजीमध्ये 'क्रिप्टो' या शब्दाचा अर्थ गुप्त असा आहे. ही एक प्रकारची डिजिटल करन्सी आहे. जी क्रिप्टोग्राफी नियमांनुसार चालते आणि संचलित केली जाते. क्रप्टोग्राफी चा अर्थ कोडिंग भाषेची उकल करण्याची कला असाही सांगितला जातो. बिटकॉइन आपण चलनाप्रमाणे प्रत्यक्ष डोळ्याने पाहू शकत नाही. तसेच त्याला हातही लावू शकत नाही. कारण बिटकॉइन पूर्णपणे डिजिटल करन्सी आहे. याला विकेंद्रीकृत डिजिटल करन्सी असेही म्हणतात.