Cryptocurrency: Bitcoin नंतर Ether गाठतय उच्चांक, क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये नवा विक्रम

क्रिप्टोकरन्सीमध्ये प्रतिदिन नवनव्या करन्सीची भर पडत आहे. क्रिप्टोकरन्सीतील सर्वात वजनदार मानल्या जाणाऱ्या Bitcoin नंतर आता आणखी एक करन्सी नवा विक्रम करताना दिसत आहे.

Cryptocurrency | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) जगभरातील अर्थव्यवस्थेत हळूहळू महत्त्वचे स्थान मिळवताना दिसत आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये प्रतिदिन नवनव्या करन्सीची भर पडत आहे. क्रिप्टोकरन्सीतील सर्वात वजनदार मानल्या जाणाऱ्या Bitcoin नंतर आता आणखी एक करन्सी नवा विक्रम करताना दिसत आहे. Ether असे या करन्सीचे नाव आहे. Ethereum ब्लॉकचेन वर आधारीत या कॉईनने एशियायी बाजारात शुक्रवारी मार्केट वैल्युएशन नुसार दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी होण्याचा बहुमान मिळवाला आहे. Reuters दिलेल्या वृत्तानुसार Ether एशियाई बाजारात 2.6% ने वाढून 4,400 डॉलर किमतीवर पोहोचला. याचा पहिला उच्चतम स्तर 4,380 डॉलर इतका होता. जो याने या वर्षाच्या 12 मे रोजी गाठला होता. या वाढीसोबत सप्टेंबरच्या शेवटच्या इथीरियम मध्ये जी घसरण पाहायला मिळत होती त्याच्या तुलनेत 60% रिकवरी Ether ने केली आहे.

भारती बाजारात Ether (ईथर)ची किंमत पाहायचे तर Coinswitch एक्सचेंज ने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 12.12 वाजता Ether किमतीत 8.76% तेजी पाहायला मिळत होती. त्याची किंमत 3,46,15627 इतकी होती. क्रिप्टोकरन्सी बाजारात पाठिमागील काही आठवड्यांमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. Bitcoin 20 ऑक्टोबरला पहिल्यांदा 67,000 डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांत 50 लाख रुपयांपेक्षा अधिक किंतीवर पोहोचला होता. शुक्रवारी दुपारी या किमतीत 4.12% तेजी पाहायला मिळाली.याची किंमत 48.81 लाखांच्याही वर चालली आहे. (हेही वाचा, Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सी, बिटकॉईन ब्लॉकचेन आदी गुंतवणूक किती सुरक्षीत? खरोखरच सुरक्षीत असतो आपला पैसा?)

Altcoin Shiba Inu ने गुंतवणुकदारांचे लक्षही अचानक वेधले आहे. अकालच्याच कॉईन व्हॅल्युएशनच्या आकडेवारीनुसार Dogecoin ला पाठिमागे टाकत आठव्या क्रमांकाची सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बनला आहे. यात गुरुवारी दुपारपर्यंत 34% उछाल पाहायला मिळाला. दरम्यान, Coingecko.com नुसार शुक्रवारी दुपारी हा कॉईन 0.2% इतकी किरकोळ घसरण पाहात होता. आणि याचि किंमत 0.00007280 डॉलरवर पोहोचली होती.