Crime News: दागिन्यांसह रोख रक्कम घेवून पाच मुलांची आई प्रियकरासोबत फरार, नवऱ्याची पोलिसात तक्रार

पण पती कामावरुन परतला तेव्हा घरातील संपूर्ण रोख रक्कम आणि बायको घरात नव्हती. नवऱ्याने आजूबाजूच्या परिसरात तसेच घरी मुलांना विचारपुस केली असता कुणालाही याबाबत माहिती नव्हती. तोच पतीने पोलिसात धाव घेतली आणि घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

Love Story | (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

हल्ली गुन्हेगारीच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. रोख रक्कमेसह पाच मुलांची आई दागिने घएवून फरार झाली असल्याची तक्रार नवऱ्याने केली आहे. संबंधीत पतीने त्याचा जुना टेम्पो २७ हजारांना विकला. हे सत्तावीस हजार रक्कम आणि दागिने घरातचं ठेवले होते. पण पती कामावरुन परतला तेव्हा घरातील संपूर्ण रोख रक्कम आणि बायको घरात नव्हती. नवऱ्याने आजूबाजूच्या परिसरात तसेच घरी मुलांना विचारपुस केली असता कुणालाही याबाबत माहिती नव्हती. तोच पतीने पोलिसात धाव घेतली आणि घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.एवढचं नाही तर पत्नीचे फळ विक्रेता जावेद सोबत विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती दिली. पतिने जावेदला बघितलं नसलं तरी त्याचा या अनैतिक नात्याबाबत कल्पना होती. तरी पतिने पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याची शंका व्यक्त केली आहे. गेले २५ दिवसांपासून त्याची पत्नी बेपत्ता असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे.  संबंधित प्रकरणाचा पोलिस तपास करीत आहेत.

 

पतीने या प्रकरणी पोलिसांकडे अनेकदा तक्रार केली आहे, मात्र कोणतीही सुनावणी होत नसल्याचं या व्यक्तीचं म्हणणं आहे. अजून काही सुगावा लागलेला नाही. पत्नीने 27 हजार रुपये आणि सोनं सोबत नेलं आहे. पतीने सांगितलं की, त्याला 5 मुलं असून त्यांना सोडून पत्नी जावेदसोबत गेली आहे. तो जावेदला कधीच भेटला नाही. फक्त तो फळं विकतो हे त्याला माहिती आहे. (हे ही वाचा:- Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशात 65 वर्षीय वृद्धाचा 10 वर्षीय मुलीवर बलात्कार, नंतर स्वत: केली आत्महत्या)

 

उत्तर प्रदेशातील बरेली येथील ही घटना असुन बरेली पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे. यात एक महिला पती आणि 5 मुलांना सोडून प्रियकरसोबत फरार झाली. तरी पतीच्या तक्रारी नंतर पत्नी विरोधात एफआयआर नोंदवण्यात आली असुन तपासात गेले काही दिवसांपूर्वी पतीदेखील तब्बल १४ महिने पोलिस कोठडी भोगुन आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.