Crime News: धक्कादायक! फेविक्विकचा वापर करत केला डबल मर्डर, अर्धनग्न अवस्थेत सापडले दोन्ही मृतदेह

राजस्थानच्या उदयपूर भागात ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. तरी रस्त्यापासून अगदी काहीचं दूर आत दोन मृतदेह आढळून आल्याने हा धक्कादायक प्रकार पूढे आला आहे.

Crime News: धक्कादायक! फेविक्विकचा वापर करत केला डबल मर्डर, अर्धनग्न अवस्थेत सापडले दोन्ही मृतदेह
Murder | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

देशात माणूसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेची दिवसेन दिवस वाढ होताना दिसत आहे.  देशात श्रध्दा वालकर हत्याकांडानंतर (Shraddha Walkar Murder Case) देश हादरला असतानाचं राजस्थानातून (Rajasthan) आता एक धक्कादायक दुहेरी हत्याकांडाची घटना पुढे आली आहे. या डबल मर्डर केसने (Double Murder Case) संपूर्ण राजस्थानास हादरवून टाकले आहे. कारण दुहेरी हत्याकांडा प्रकरणी एका भोंदू बाबास अटक केली आहे आणि या बाबाने आपला गुन्हा कबूल करत किती निघृण पध्दतीने हा गुन्हा केला आहे ह्याची माहिती दिली आहे. काठी,लाठी, विश नाही तर थेट फेविक्विकचा वापर करत या भोंदू बाबाने दोघांची हत्या केली असल्याची माहिती दिली आहे. राजस्थानच्या उदयपूर (Udaipur) भागात ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.  तरी रस्त्यापासून अगदी काहीचं दूर आत दोन मृतदेह आढळून आल्याने हा धक्कादायक प्रकार पूढे आला आहे.

 

या हत्याकांडातील मृतकांचे नाव सोनु कवर (Sonu Kanwar) आणि राहुल मीणा (Rahul Meena) असे होते. हे दोघही विवाहीत (Married) होत पण लग्नानंतर ही या दोघांचे अनैतिक (Extra Marrital Affair) संबंध होते. दरम्यान हे दोघही शेषनागाच्या मंदीरात दर्शनासाठी येत असतं. तिथे या दोघांचीही ओळख भोंदू बाबा बरोबर झाली. तरी मृत राहुल मीणा ह्याची पत्नी देखील या मंदीरात दर्शनासाठी यायची. दरम्यान तिने आपला पती राहुलसाठी भोंदु बाबाकडे पारिवारीक शांतीसाठी ताबिज मागितली असता भोंदु बाबाने तिच्या पतीचे सोनु कवर नामक स्त्रीशी विवाहबाह्य संबंध  असल्याची माहिती दिली. (हे ही वाचा:- Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा वालकरच्या निर्घृण हत्येचे समर्थन करणाऱ्या रशिदचा बुलंदशहर पोलीसांकडून शोध सुरू)

 

हा सगळा प्रकार सोनु कवर आणि राहुल मीणाला कळला असता त्या दोघांनीही बाबाची भोंदुगिरी पुढे आणण्याची धमकी दिली. भोंदुबाबाने यापासून बचावासाठी एक योजना आखली. ५० फेविक्विक जमा करत या हे प्रेमयुगल शारिरीक संबंध साधत असताना त्यांच्या अंगावर टाकलं, नंतर चाकू आणि गोट्याने वार करत या दोघांचीही हत्या केल्याची कबुली भोंदुबाबने दिली आहे. तरी राजस्थान पोलिसांकडून या बाबास अटक करण्यात आली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 23, 2022 11:26 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).