Covid-19 Vaccine Update: सप्टेंबर अखेरपर्यंत 20 कोटी Covishield तर 1 कोटी Zydus DNA लसींचे डोस विकत घेण्याची केंद्राची योजना
सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत केंद्र सरकारन Zydus DNA कोविड लसीचे 1 कोटी डोस खरेदी करू शकते.
केंद्र सरकारने (Central Government) दर महिन्याला 25 कोटी लसींचे डोस देण्याचे नियोजन केले आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत केंद्र सरकार Zydus DNA कोविड लसीचे 1 कोटी डोस तर कोविशिल्डचे (Covishield) 20 कोटी डोसेस खरेदी करू शकते, अशी माहिती केंद्र सरकारच्या एका उच्च अधिकाऱ्याने दिली आहे. कोविड-19 लसीकरणाचा (Covid 19 Vaccination) वेग वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारची ही योजना आहे.
भारत या महिन्यात कोविशील्डचे सुमारे 20 कोटी डोस आणि कोवाक्सिनचे 3.5 कोटी डोस खरेदी करेल आणि दरमहा 25 कोटीपेक्षा जास्त डोस खरेदी करण्याचे लक्ष्य आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सूत्रानुसार, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तब्बल 100 कोटी लसीकरण अपेक्षित आहे. (COVID-19 Vaccine Update: Sputnik V च्या निर्मितीमध्ये आता Serum Institute of India देखील सहभागी; सप्टेंबर महिन्यापासून होणार सुरूवात)
देशात लसींचा तुटवडा नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. केंद्र विलंब न करता, राज्यांना आवश्यक तितक्या लसी डोस पुरवण्यास सक्षम आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या महिन्यात Covisheild चे 20 कोटी डोस देणार असल्याचे सूत्राने सांगितले. गेल्या महिन्यात, SII ने Covishield चे 19 कोटी डोस पुरवले. स्त्रोतांनी असेही म्हटले आहे की लसीचा पहिला डोस प्रशासित करण्यासाठी मतदानाशी संबंधित राज्ये सर्वोच्च प्राधान्य यादीत आहेत.
भारताने शुक्रवारी एकाच दिवसात सर्वाधिक लसीचे डोस देण्याचा नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. त्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त भारताने 'लसीकरण सेवा' मोहिमेअंतर्गत 2.5 कोटींहून अधिक लसींचे डोसेस देऊन उच्चांक गाठला आहे.