Covid-19 Vaccine Update: भारत बायोटेक लवकरच सुरु करणार कोविड-19 वरील Nasal Vaccine च्या ट्रायल्स

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल्स नागपूर मधील गिलूरकर मल्टी स्पेशालिटी येथे पुढील दोन आठवड्यात सुरु होतील.

Vaccine | Image used for representational purpose (Photo Credits: Oxford Twitter)

कोरोना व्हायरस (Coronavirus) विरुद्ध स्वदेशी लस निर्माण केलेली संस्था भारत बायोटेक (Bharat Biotech) आता internasal vaccine च्या ट्रायल्स सुरु करणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल्स नागपूर (Nagpur) मधील गिलूरकर मल्टी स्पेशालिटी (Gillurkar Multi Speciality) येथे पुढील दोन आठवड्यात सुरु होतील. भारत बायोटेक दोन internasal vaccines वर काम करत आहे. (Bharat Biotech, Serum Institute of India कडून COVID-19 ला रोखण्यासाठी Intranasal Vaccines ची निर्मिती; जाणून लसीच्या या प्रकाराबद्दल आणि त्याच्या अपडेट्स विषयी!)

आम्ही डबल डोस लसींच्या तुलनेत सिंगल डोस लसींवर काम करत आहोत. नेझल लस हा उत्तम उपाय असल्याचे संशोधकांनीही म्हटले आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग नाकावाटे देखील होतो, असे भारत बायोटेकचे प्रमुख Dr Krishna Ella यांनी इंडिया टुडे शी बोलताना सांगितले. या ट्रायल्ससाठी  18-45 वयोगटातील  30-45 निरोगी स्वयंसेवकांची निवड करण्यात येईल. भुवनेश्वर, पुणे, नागपूर आणि हेद्राबाद येथे या ट्रायल्स पार पडतील. (Bharat Biotech-Serum Institute Joint Statement : भारत बायोटेक, सीरम इन्स्टिट्यूट यांच्यातील भांडण मिटले; संयुक्त पत्रकाद्वारे वादावर पडदा)

भारत बायोटेकने युएस स्थित nasal COVID-19 vaccine निर्मिती संस्था FluGen आणि University of Wisconsin Madison चे शास्त्रज्ञ यांच्याशी भागीदारी केली आहे. भारत बायोटेक University of Washington School of Medicine सोबत अजून एका nasal vaccine ची निर्मिती करत आहे. दरम्यान, सीरम इंस्टीट्यूटने देखील वॉश्गिंटन युनिव्हर्सिटी आणि सेन्ट लुईस युनिव्हर्सिटी सोबत नेझल लसीच्या ट्रायल्ससाठी पार्टनरशिप केली आहे.

Intranasal Vaccine म्हणजे काय?

लसी या विविध माध्यमातून दिल्या जातात. उदा. काही लसी या इंजेक्शनच्या माध्यमातून दिल्या जातात. तर लहान मुलांना तोंडावाटे लसी दिल्या जातात. Intranasal Vaccine लसी या नाकावाटे दिल्या जातात. यामुळे लसी देण्यासाठी लागणारे साहीत्य उदा. सिरींज, निडल्स, स्वॅब्स यांची आवश्यकता भासत नाही. परिणामी त्यावर होणारा खर्च कमी होतो.