COVID-19 Vaccination in India: जून अखेरपर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मिळणार 4.87 कोटी कोविड-19 लसींचे डोस- आरोग्य मंत्रालय
जून महिन्याच्या अखेरपर्यंत देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 4,87,55,000 कोविड-19 लसींचे डोस उपलब्ध करुन दिले जातील, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
जून महिन्याच्या अखेरपर्यंत देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 4,87,55,000 कोविड-19 लसींचे (Covid-19 Vaccine) डोस उपलब्ध करुन दिले जातील, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) दिली आहे. लस उत्पादकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. कोविड-19 लसीकरण पूर्ण क्षमतेने होण्यासाठी लसीची उपलब्धता असणे आवश्यक आहे. जिल्हानिहाय कोविड लसीकरण सेंटर्स तयार करण्याचा सल्ला केंद्र सरकारने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशआंनादिला आहे. याबद्दल माहिती नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी मल्टीपल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
सरकारी आणि खाजगी लसीकरण केंद्र कोव्हिन च्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर अपडेट्स करण्यासही सांगितलं आहे.तसंच लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ नये याची काळजी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी घ्यावी. त्यासोबतच कोव्हिन अॅपवरुन लोकांना सहजरित्या बुकींग करता यावे, याची सुद्ध जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी. 15 जून पर्यंतच्या लसीकरणाचा प्लॅन आधीपासूनच तयार ठेवण्यास केंद्राने सांगितले आहे.
भारतातील लसीकरण मोहिम 16 जानेवारीपासून सुरु झाली असून 18-44 वयोगटातील नागरिकांसाठी 1 मे पासून लसीकरणाला सुरुवात झाली. देशातील 50 टक्के ड्रग लॅब्स लसीकरणाचे उत्पादन करत असून या लसी केंद्र आणि राज्य सरकारांना मोफतच देण्यात येणार आहेत. (Covid-19 Vaccine Update: भारतातील Biological E. करणार J & J कोविड-19 लसीची निर्मिती)
कोविड-19 लसीच्या उपलब्धतेबद्दल आरोग्य मंत्रालयाकडून आधीपासूनच माहिती दिली जाईल. लसीच्या उपलब्धतेनुसार, राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना लसीचे वितरण केले जाईल. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 1 मे ते 30 जून दरम्यान राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना एकूण 59629000 लसीचे डोस मोफत वितरण केले जातील.