Covid-19 Recoveries: गेल्या 5 महिन्यात 3/4 पेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त: आरोग्य मंत्रालय
दिवसागणित वाढत जाणारी कोरोना बाधितांची संख्या चिंताजनक असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही चांगली आहे.
कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट अद्याप टळलेले नाही. दिवसागणित वाढत जाणारी कोरोना बाधितांची संख्या चिंताजनक असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही चांगली आहे. गेल्या 5 महिन्यात 3/4 पेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1/4 पेक्षा कमी अॅक्टीव्ह रुग्ण (Active Cases) आहेत. केंद्र सरकारने हाती घेतलेल्या टेस्ट, ट्रॅक, ट्रिट (Test-Track-Treat) या त्रिसुत्रीची प्रभावी अंमलबजावणी झाली असल्याने रिकव्हरी रेट (Recovery Rate) अधिक आहे. तर मृत्यूदर (Fatality Rate) कमी आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या अधिक आहे, कोरोनावर लस किंवा औषध उपलब्ध नसल्याने कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात आणणे हे देशासमोरील मोठे आव्हान होते. परंतु, सध्याची आकडेवारी पाहता टेस्ट, ट्रॅक, ट्रिट ही त्रिसुत्री काम करत असल्याचे दिसून येत आहे. (भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 33 लाखांचा टप्पा; आतापर्यंत 60 हजार 472 मृत्यूची नोंद)
ANI Tweet:
दरम्यान काल सकाळच्या अपडेटनुसार, देशातील कोरोना बाधितांच्या संख्यने 33 लाखांचा टप्पा पार केला असून रुग्णसंख्या 3310235 इतकी आहे. त्यापैकी 2523772 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 725991 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर देशात आतापर्यंत 60472 मृत्यू झाले आहेत.